esakal | Career Tips : 'या' ४ गोष्टी फॉलो करा अन् टाइमपास करणाऱ्या कलिग्सपासून रहा दूर
sakal

बोलून बातमी शोधा

'या' ४ गोष्टी करा अन् टाइमपास करणाऱ्या कलिग्सपासून रहा दूर

'या' ४ गोष्टी करा अन् टाइमपास करणाऱ्या कलिग्सपासून रहा दूर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दोन प्रकार असतात. पहिला जे प्रमाणिकपणे काम करत असतात. तर दुसरा, जे काम कमी आणि टाइमपास जास्त करतात. मात्र, या टाइमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अनेकदा आपल्याही कामात व्यत्यय येतो. त्यामुळे अशा कलिग्सपासून दूर राहिलेलंच बरं असतं. परंतु, टाइमपास करणाऱ्या या कलिगला नेमकं टाळायचं कसं हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच, या लोकांपासून दूर कसं रहावं याच्या काही टीप्स जाणून घेऊयात. (career-and-money-how-to-stay-away-from-the-colleagues-who-waste-time)

१. खूप काम असल्याचं भास निर्माण करा -

ऑफिसमध्ये असे अनेक कलिग्स असतात जे काम सोडून इतर वायफळ बडबड करत असतात. अशा व्यक्तींना सतत लोकांची निंदा करणे, एकमेकांविषयी गैरसमज निर्माण करणे किंवा एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याची सवय असते. अशा व्यक्ती स्वत: हून तुमच्याशी बोलायला येतात आणि लोकांची निंदा करण्यात तुमचा वेळ खर्ची करतात. त्यामुळे या व्यक्ती दिसल्यावर अनेकदा रस्ता बदलावासा वाटतो. मात्र, तुम्ही कितीही नजर चुकवलीत तरी ते तुम्हाला हेरतात. म्हणूनच, जर अशी व्यक्ती तुमच्या टेबलपाशी येऊन वायफळ गप्पा मारत असेल. तर, तुम्ही महत्त्वाच्या कामात असल्याचं भासवा. तसंच चेहरा थोडासा त्रासिक करा, ज्यामुळे तुम्ही खरंच महत्त्वाच्या कामात आहात हे त्यांना समजेल. किंवा, त्यांच्या बडबडीमुळे तुम्ही वैतागला आहात याची त्यांना जाणीव होईल. तसंच, ते बोलत असताना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्येच लक्ष द्या. ज्यामुळे तुम्हाला त्याच्या बोलण्यात स्वारस्य नसून तुम्ही दुर्लक्ष करत असल्याचं त्यांच्या लक्षात येईल.

हेही वाचा: प्रेझेंटेशन देताना चुका होण्याची भीती वाटते?

२.समजावून सांगा -

अनेक कलिग्स सतत तक्रारींचा पाढा वाचत असतात. कायम नकारात्मक गोष्टींवर चर्चा करत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूरच रहा. या व्यक्तींमुळे आपल्यावरही नकारात्मक परिणाम होत असतो. कोणतीही चांगली गोष्ट घडली तरीदेखील या व्यक्ती त्यात चूका शोधत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना प्रेमाने किंवा रागाने समज द्या आणि त्यांच्यापासून दूर रहा.

३. कामाचा स्पीड -

अनेक कलिग्सच्या कामाचा स्पीड चांगला असतो. हे कलिग्स स्वत:चं काम पटापट आवरतात आणि फावल्या वेळात इतरांशी गप्पा मारतात. ज्यामुळे दुसऱ्यांचं काम नीट होत नाही. विशेष म्हणजे हे लोक तुमच्या जवळ येऊन काम कसं करावं, कोणती गोष्ट कशी हाताळावी याचं ज्ञान देत बसतात. परंतु, जर ते स्वत: कामात असतील तर ते दुसऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यामुळे या कलिग्सची खेळी ओळखा आणि ते तुमच्याशी गप्पा मारायला आले तर थेट त्यांना शांत राहण्यास सांगा. जर तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारत राहिलात तर तुमचं काम अपूर्ण राहिलं. परिणामी, तुमच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होईल.

हेही वाचा: मृत्यूपत्र तयार करताना घ्या काळजी; होणार नाही मुलांमध्ये वाद

४. गॉसिपिंगमध्ये सहभागी होऊ नका -

बऱ्याच ऑफिसमध्ये गॉसिपिंग करणाऱ्यांचा एक ग्रुप असतो. जे सतत इतरांविषयी चर्चा करत असतात. या ग्रुपपासून लांब रहा. कारण, सतत गॉसिपिंग केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो.लोकांविषयी चर्चा करण्यापेक्षा आपलं काम कसं चांगलं करता येईल याकडे लक्ष द्या. तसंच, लोकांच्या पर्सनल लाइफमध्ये ढवळाढवळ करणे किंवा त्यांच्या लाईफविषयी चर्चा करणे अत्यंत चुकीचं आहे. हे कटाक्षाने टाळा.

loading image