मांसाहारी पुरुषांसाठी धक्कादायक बातमी! पर्यावरणासाठी ठरताहेत धोकादायक | Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांसाहारी पुरुषांसाठी धक्कादायक बातमी! पर्यावरणासाठी ठरताहेत धोकादायक
मांसाहारी पुरुषांसाठी धक्कादायक बातमी! पर्यावरणासाठी ठरताहेत धोकादायक

मांसाहारी पुरुषांसाठी धक्कादायक बातमी! पर्यावरणास ठरताहेत धोकादायक

जे पुरुष मांसाहाराचे शौकीन आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी आहे. तुमचा रोजचा मांस (Meat) आणि मासे (Fish) असलेला आहार पर्यावरणासाठी (Environment) अधिक हानिकारक आहे. यूकेच्या लीड्‌स विद्यापीठाने (Leeds University) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे. ग्रीनहाऊस (Greenhouse) वायू उत्सर्जन निर्धारित करण्यासाठी संशोधकांनी 212 प्रौढांच्या दैनंदिन आहाराचे विश्‍लेषण केले. या काळात असे आढळून आले की, वातावरणात महिलांच्या तुलनेत पुरुषांचा आहार 41 टक्के अधिक हरितगृह वायू उत्सर्जनास कारणीभूत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, महिलांपेक्षा पुरुष जास्त मांसाहार करतात. खरं तर, मांस उत्पादन शाकाहारापेक्षा 59 टक्के अधिक हरितगृह वायू तयार करते.

हेही वाचा: निमराना फोर्टसंबंधी 'या' गोष्टी माहीत आहेत? करा सहलीचे नियोजन

प्रमुख संशोधक हॉली रिपिन यांच्या मते, पृथ्वी वाचवण्याच्या मोहिमेत आपण सर्वजण हातभार लावू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात किरकोळ बदल करावे लागतील. मांसाहारी (विशेषतः लाल मांस), मिठाई आणि फास्ट फूड कमी करून आपण हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास मदत करू शकतो. हवामान बदलाशी लढा देण्याच्या मोहिमांमध्ये लोकांना शाकाहार स्वीकारण्यास प्रवृत्त करण्यावर रिपिनने भर दिला आहे. अभ्यासाचे परिणाम PLOS One या जर्नलच्या अलीकडील अंकात प्रकाशित झाले आहेत.

हरितगृह उत्सर्जनाचा मोठा वाटा

  • अन्न उत्पादन हा हरितगृह उत्सर्जनाचा प्रमुख स्रोत आहे. जागतिक स्तरावर एकूण हरितगृह वायू उत्सर्जनात 33 टक्के वाटा असल्याचा अंदाज आहे.

  • कमी पौष्टिक आहारही नाही यात कमी दोषी!

  • प्रक्रिया केलेले घटक (उच्च कॅलरी, खूप कमी पोषक) पर्यावरणासाठी अधिक हानिकारक असल्याचे मागील काही अभ्यासांमध्ये आढळून आले आहे.

हेही वाचा: चालू आर्थिक वर्षात SBI ला 9.6 टक्के विकासदर वाढीची अपेक्षा!

काय आहेत कारणे?

  • कोंबडी, शेळ्यांसह इतर जीव मोठ्या प्रमाणात मिथेन वायू वातावरणात सोडतात

  • मिथेन कार्बन डायऑक्‍साइडपेक्षा 25 टक्के जास्त उष्णता शोषून घेते

  • गुरे पाळण्यासाठी वनजमिनीचे शेतजमिनीत रूपांतर करावे लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे तोडावी लागतात

  • पशुखाद्य निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, खताच्या वापरामुळे नायट्रोजन ऑक्‍साईडचे उत्सर्जन होते

loading image
go to top