
Republic Day 2025 Fashion Tips: दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. खरं तर, भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाली, ज्याने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले. अशावेळी या दिवशी शाळा आणि सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सणाला मुली खूप वेषभूषा करतात आणि देशभक्तीची झलक दाखवतात. जर तुम्हाला तुमच्या लूकमध्ये देशभक्तीची झलक दाखवायची असेल तर तिरंग्याचा सूट घालू शकता. यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेऊ शकता.