आजींची बातच न्यारी..! वयाच्या ८८ व्या वर्षी तरुणांना देतायेत फिटनेसचे धडे

आजींची बातच न्यारी..! वयाच्या ८८ व्या वर्षी तरुणांना देतायेत फिटनेसचे धडे

वय हा केवळ आकडा आहे असं कायमच म्हटलं जातं. त्यामुळे वयाने मोठं होण्यापेक्षा दिवसेंदिवस मनाचं तारुण्य जपणं खरं गरजेचं आहे. आपल्या आजुबाजूला अशा अनेक व्यक्ती पाहायला मिळतात ज्या, खऱ्या अर्थाने त्यांच्या मनाचं तारुण्य जपतात आणि इतरांनादेखील प्रेरणा देतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ८८ वर्षीय आजींची चर्चा रंगली आहे. वयाची ८० वर्ष पार केलेल्या या आजी चक्क जीम ट्रेनर असून त्यांनी आतापर्यंत जवळपास एक हजारांपेक्षा जास्त महिलांना जीम ट्रेनिंग दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर नाहिदा अब्देन(Nahid Abden) या महिलेची चर्चा रंगली आहे. नाहिदा अब्देन या ८८ वर्षांच्या असून त्या जीम ट्रेनर आहेत. विशेष म्हणजे वर्कआऊट करतांना त्यांचा उत्साह तरुणांनादेखील लाजवेल असाच आहे. वयाच्या ५० व्या वर्षी आपल्याला जीम आणि स्पोर्ट्सची आवड असल्याचं नाहिदा यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या कार्यात स्वत:ला झोकून दिलं. इतकंच नाही तर आज त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय जीम ट्रेनरपैकी एक आहेत.

काही वर्षांपूर्वी गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या नाहिदा यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीम जॉइन केली होती. सुरुवातीच्या काळात नाहिदा यांनी जीममध्ये अवघडल्यासारखं वाटायचं. मात्र,कालांतराने त्यांना जीमला जाण्याची सवय होऊ लागली आणि त्यांच्या मनातील न्यूनगंड कमी झाला. त्यानंतर त्यांनी जीम इंस्ट्रक्टरचं ट्रेनिंगही घेतलं. विशेष म्हणजे जीम इंस्ट्रक्टरचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांनी लोकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रथम छोटेखानी असलेल्या त्यांच्या जीमचा कालांतराने मोठा वटवृक्ष झाला आणि आज त्या लोकप्रिय जीम ट्रेनर म्हणून ओळखल्या जातात.

दरम्यान, नाहिदा यांच्या पतीचं ४० वर्षांपूर्वी निधन झालं असून त्यांना चार मुलं आहे. पतीच्या निधनानंतर नाहिदा यांनी दुसरं लग्न न करता मुलांवर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे आज त्या यशस्वी जीम ट्रेनर म्हणून ओळखल्या जातात.विशेष म्हणजे याच वर्कआऊटमुळे त्यांनी कर्करोगावरही मात केल्याचं सांगण्यात येतं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com