Video: मांजरीला पडलीये 'सिक्स पॅक अ‍ॅब्स'ची भूरळ; पाहा तगडा वर्कआऊट

Video: मांजरीला पडलीये 'सिक्स पॅक अ‍ॅब्स'ची भूरळ; पाहा तगडा वर्कआऊट

अनेकदा आपल्या आजुबाजूला असे काही प्रसंग घडत असतात जे पाहून आपल्याला हसू अनावर होतं. यातच सोशल मीडियावरही काही भन्नाट व्हिडीओ किंवा मीम्स व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा प्राण्यांचे मस्ती करतांनाचे व्हिडीओ असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर एका मांजरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मांजर चक्क वर्कआऊट करतांना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून ही मांजर सिक्स पॅक अ‍ॅब्स करण्याचा प्रयत्न करतीये असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मांजर चक्क वर्कआऊट करत आहे. यात उभ्या असलेल्या एका कारच्या चाकावर या मांजरीने पाय टेकवले असून ती व्यायाम करत आहे. विशेष म्हणजे तिच्यातील हा खट्याळपणा पाहून ही मांजर सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे.

१४ सेकंदाचा असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्याला १४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे या मांजरीप्रमाणेच सोशल मीडियावर असे प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच कमरेवर हात ठेवून धावणाऱ्या सरड्याचा व्हिडीओदेखील चांगलाच चर्चेत आला होता.  
मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com