Chaitra Navratri 2023 : नवरात्रीत लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचंय?  मग देवीपुढे रांगोळीचे हेच डिझाईन्स काढा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chaitra Navratri 2023

Chaitra Navratri 2023 : नवरात्रीत लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचंय?  मग देवीपुढे रांगोळीचे हेच डिझाईन्स काढा!

चैत्र नवरात्रीचा उत्सव यावर्षी 22 मार्चपासून सुरू होणार झाला आहे. नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे. परंपरेप्रमाणे देवघरात कलशाची प्रतिष्ठापणा करून त्याची नऊ दिवस त्याची पूजा केली जाते. देवीचे प्रतिक म्हणूनच त्या कलशाची मांडणीही केली जाते.

कलश देवघरात ठेवल्यानंतर साक्षात लक्ष्मी माताच घरात प्रवेश केल्याचे भासते. त्यामूळे एक वेगळी प्रसन्नता घरात येते. या वातावरणाला अधिक प्रसन्न करायला देवासमोर, अंगणात वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या जातात.  

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये, प्रत्येक दिवस माँ दुर्गेच्या रूपाला समर्पित केला जातो. नवदुर्गेच्या आगमनानिमित्त दिवे, फुलांच्या माळा, रांगोळी काढून घर सजवू शकता. सणांमध्ये दारात रांगोळी काढण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामूळे या नवरात्रीला तुम्ही लक्ष्मी मातेसाठी खास रांगोळी काढू शकता.

देवीच्या चेहऱ्याची रांगोळी

रांगोळीची डिझाईन काढून तूम्ही त्यामध्ये देवीचा मुखवटा काढू शकता. कडेने बॉर्डर करून बाहेरील बाजून वेगवेगळी डिझाईन करू शकता.

देवीच्या मुखवट्याची रांगोळी

देवीच्या मुखवट्याची रांगोळी

धान्याची रांगोळी

नवरात्रीत घरोघरी हळदी कुंकू समारंभ होत असतात. त्यामूळे मैत्रिणींनी  तूमची कला पहावी, त्याचं कौतूक करावं असं वाटत असेल तर अशी धान्याच्या राशी मांडून तूम्ही रांगोळी काढू शकता.

धान्याची रांगोळी

धान्याची रांगोळी

बांगडीची सजावट असलेली रांगोळी

सध्या कोणत्याची वस्तूपासून रांगोळी सजवली जात आहे. मध्यंतरी चमच्यांनी रांगोळी काढल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता बांगडी, नेकलेस यांची रांगोळी प्रसिद्ध झाली आहे.

बांगडीची सजावट असलेली रांगोळी

बांगडीची सजावट असलेली रांगोळी

दागिन्यांची रांगोळी

दागिन्यांचे चित्र असलेली रांगोळी सर्वत्र पहायला मिळते. मंदिर, लग्न असो वा हळदी कुंकूचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी आपल्याला दागिन्यांची डिझाईन असलेली रांगोळी दिसते.

दागिन्यांची रांगोळी

दागिन्यांची रांगोळी