

Chanakya Niti
sakal
CHANAKYA NITI AND DESTINY : आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनीही ओळखले जाते. ते फक्त राजकारण आणि अर्थशास्त्राचे जाणकार नव्हते, तर त्यांनी माणसाचा स्वभाव आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींचाही बारकाईने अभ्यास केला होता. त्यांचे विचार ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात पाहायला मिळतात.
चाणक्यांच्या मते, आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त नशिबावर अवलंबून राहून चालत नाही. आपल्या रोजच्या सवयी, मेहनत आणि वागणूक यांचाही आयुष्यावर मोठा परिणाम होतो. चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही उपयोगी ठरू शकतात. त्यातील या दोन सवयी माणसाच्या आयुष्याला हळूहळू योग्य दिशा देऊ शकतात.