Chanakya Niti: पुरूषांचे 'हे' गुण महिलांना करतात आकर्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chanakya Niti

Chanakya Niti : पुरूषांचे 'हे' गुण महिलांना करतात आकर्षित

Chanakya Niti : ज्या पुरूषासोबत सबंध आयुष्य काढायचे असते त्या पुरुषासोबत आपण किती सुरक्षित, कंफरटेबल राहू शकतो याचा विचार महिला करतात. प्रत्येक स्त्रीला तिचा जीवनसाथी चांगल्या गुणांनी परिपूर्ण असावा असे वाटते. या पुरूषांच्या शोधात महीला नेहमी असतात. चाणक्याच्या मते, पुरुषांमध्ये असे काही गुण असतात जे त्यांना उत्तम बनवतात. चाणक्याची धोरणे पाहिली तर चांगला माणूस ओळखता येतो. तर मग चाणक्यानुसार पुरुषाचे कोणते गुण असतात जे महिलांना आकर्षित करतात.

हेही वाचा: Chanakya Niti: रागात असताना 'या' चार लोकांशी चुकूनही भांडू नका, नाहीतर…

प्रामाणिकपणा

चाणक्य म्हणतो की, जो माणूस नातेसंबंधात प्रामाणिक असतो तो सर्वत्र आदरास पात्र असतो. ज्या पुरुषांचा हेतू स्त्रियांबद्दल उदात्त असतो, ते आपल्या पत्नीला, मैत्रिणीला कधीही फसवू शकत नाहीत. पुरुषांचा हा गुण महिलांना आकर्षित करतो. असे पुरुष त्यांचे नाते दृढ करण्यासाठी सतत प्रयत्न करतात आणि कधीही खोटे बोलत नाहीत.

हेही वाचा: chanakya NIti: चुकूनही ‘या’ गोष्टींना पाय लावू नका, नाहीतर करावा लागेल आयुष्यभर पश्चाताप

वागण

संस्कार, गोड बोलणे, सौम्यता या गुणांची अपेक्षा महिलांकडून अनेकदा केली जाते, पण हे गुण पुरुषांमध्ये असतील तर त्यातून त्यांची सत्यता दिसून येते. अशी माणसे आपल्या सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकतात. या गुणाचा महिलांवर खूप परिणाम होतो. पुरुषांचे इतरांबद्दलचे वागणे त्यांच्या चांगल्या आणि वाईट वागणुकीना दर्शवते.

हेही वाचा: Chanakya Niti: 'या' गोष्टींना चुकूनही लाथ मारू नका; अन्यथा आयुष्यातील आनंद निघून जाईल!

चांगला श्रोता

प्रत्येक स्त्रीला तिचा जीवनसाथी सावलीसारखा तिच्या पाठीशी उभा राहावा असे वाटते. चांगल्या श्रोत्याप्रमाणे त्याने तिचे ऐकावे असे तिला वाटते. तुमच्यात बोलण्याची क्षमता असेल तर ऐकण्याची हिंमतही असली पाहिजे. ही सत्पुरुषाची खूण आहे. महान माणूस आपल्या चुकांची माफी मागायला कधीच मागे हटत नाही. त्याच वेळी, जे महिलांच्या बोलण्याकडे लक्ष देतात, त्यांचे बोलणे ऐकतात असे पुरुष महिलांना आवडतात.

Web Title: Chanakya Niti These Qualities In Men Attract Women As Life Partner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyle