esakal | Corona virus: जाणून घ्या, मुंबईत कुठं उपलब्ध आहेत बेड

बोलून बातमी शोधा

Beds Shortage For Corona Patients
Corona virus: जाणून घ्या, मुंबईत कुठं उपलब्ध आहेत बेड
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता रौद्ररुप धारण केलं आहे. आतापर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली असून हजारो लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवत आहेत. त्याचसोबत अनेक ठिकाणी कोविड सेंटरदेखील उभारले आहेत. मात्र, रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता अनेक कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर व बेडची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह असलेल्या अनेकांना बेडची प्रतीक्षा करावी लागत आहे. यातच अनेकांना नेमकं कोणत्या सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत याचीच माहिती नाही. त्यामुळे कोणत्या कोविड सेंटरमध्ये बेड आहेत हे नेमकं कसं जाणून घ्यायचं ते पाहुयात.

देशातील रुग्णसंख्या पाहता प्रत्येक राज्यातील सरकारने कोविड ग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेची संकेतस्थळे तयार केली आहेत. या संकेतस्थळांच्या माध्यमातून कोविडग्रस्तांना आसपासच्या कोविड सेंटर, बेड आणि ऑक्सिन सिलेंडर याविषयी माहिती मिळणार आहे. मुंबईतदेखील रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या संकेतस्थळावर कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध बेड व ऑक्सिजन सिलेंडरविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसंच, कोणत्या सेंटरमध्ये किती बेड शिल्लक आहेत हे देखील विभागनिहाय नमूद केलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर गेल्यानंतर सविस्तर माहिती उपलब्ध होईल.

हेही वाचा: कोरोनाची लक्षणं आढळली तर कोणती टेस्ट करणं योग्य?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. तर, असंख्य जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाची कोणतीही सामन्य लक्षणं जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.