esakal | कोरोनाची लक्षणं आढळली तर कोणती टेस्ट करणं योग्य?

बोलून बातमी शोधा

corona test
कोरोनाची लक्षणं आढळली तर कोणती टेस्ट करणं योग्य?
sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या या विषाणूने रौद्र रुप धारण केलं असून त्याचा संसर्ग आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्येच प्रशासनाकडूनदेखील मोठ्या संख्येने वैद्यकीय उपाययोजनांची तरतूद करण्यात येत आहे. यात लसीकरणाचा वेगदेखील झपाट्याने वाढला आहे. त्यातच कोरोनाची सर्वसामान्य लक्षणं जरी आढळून आली तरीदेखील लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची व कोरोना चाचणी करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. यामध्येच कोरोना चाचणी करण्याविषयी नागरिकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. त्यातच महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर नेमकी कोणती टेस्ट करावी किंवा कोणत्या टेस्ट केल्या जातात हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

लक्षण आढळल्यास करा 'ही' टेस्ट

कोरोनाची लक्षण आढळल्यास जवळच्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन तुम्ही कोरोना चाचणी करु शकता. सरकारी रुग्णालयात गेल्यास मोफत तपासणी केली जाते. तर, खासगी रुग्णालयात गेल्यास तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागतील. कोरोनाच्या मुख्यत: तीन टेस्ट केल्या जातात. त्या कोणत्या ते पाहुयात.

१.अॅटीबॉडी टेस्ट किट-

या टेस्टमध्ये कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी तुमच्या शरीरातील किती अॅटीबॉडी आहेत हे तपासता येतं.

२. अॅटीजन टेस्ट किट-

अॅटीजन टेस्ट या चाचणीमध्ये संबंधित व्यक्तीच्या नाक व घसा यामधून तपासणीसाठी काही सॅम्पल घेतले जातात. यात विषाणूवर असलेल्या एका खास प्रोटीनचा थर किती आहे ते लक्षात येतं.

हेही वाचा: Corona virus : कापूर, लवंग अन् ओव्यामुळे वाढते ऑक्सिजनची पातळी?

३. आरटी पीसीआर टेस्ट -

आरटी पीसीआर टेस्टमध्ये डीएनए आणि आरएनए ची चाचणी केली जाते. कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे पाहण्याची ही उत्तम पद्धत असल्याचं म्हटलं जातं. मात्र, काही वेळा यात चुकीचा रिपोर्ट येण्याचीही शक्यता असते.

नेमकी कधी करावी चाचणी?

अशक्तपणा, ताप, अंगदुखी, चव न लागणे, वास न येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, डोळे लाल होणे आणि जुलाब होणे या सारखा त्रास जाणवू लागल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी.