वडिलांना पाठवा Father's Day च्या हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक भारी Quotes

खालीलपैकी एखादा सुंदर कोट्स आपल्या बाबांना पाठवुन फादर्स डेच्या शुभेच्छा दया.
father's day
father's daysakal

आई हा घराचा जीव असते तर बाबा आयुष्याचा आधार असतो. हे वाक्य अगदी खरं आहे. आई ही कुटुंबाचा डौलारा वडिलांच्या आधारामुळे व्यवस्थित सांभाळू शकते हा विचार आपण नीट करायला हवा. आईसाठी असंख्य कोट्स आतापर्यंत लिहले गेले आपण ते वाचले शेअरही केले पण यावर्षी आम्ही तुम्हांला तुमच्या वडिलांवर आधारीत फादर्स डे कोट्स सांगणार आहोत. जे तुम्ही तुमच्या वडिलांना पाठवून त्यानी आनंदी करु शकता. (check list of wishes and quotes which you can share with your father on fathers day)

father's day
Father’s Day 2022 : का साजरा केला जातो फादर्स डे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

आईसाठी तर आपण बरंच काही करत असतो, पण या फादर्स डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या बाबांना देखील प्रेमपूर्वक संदेश पाठवुन कृतज्ञता व्यक्त करावी.

एक कवी बाबांविषयी खुप छान लिहतो.

'"सगळे म्हणती आईची वेडी माया

तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया"

बाप नावाचा माणुस खुप दिलदार असतो. पण तो त्याच प्रेम क्षणोक्षणी व्यक्त नाही करत.कारण त्याला घर चालवायच असतं . कधी कधी तर वडील ईच्छा नसतांना देखील कठोर वागतात कारण असतं की कुटुंबातील प्रत्येकाला शिस्त लागावी. कदाचित बाबाच्या अशा वागण्यामुळेच बाबांविषयी मनात जरा संकोच राहतो. हाच संकोच तुम्ही आज फादर्स डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मनातुन काढुन टाका आणि आम्ही खाली सांगितलेल्या कोट्सपैकी एखादा सुंदर कोट्स आपल्या बाबांना पाठवुन फादर्स डेच्या शुभेच्छा दया. (Happy Father's Day)

father's day
आंतरराष्ट्रीय योग दिन : ही योगासने करतील मासिक पाळीच्या समस्या दूर

1) आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा आहे.

तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

2) तुम्ही आयुष्यत कितीही मोठे झाला तरीही

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही

मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

3)आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात.

मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली आहे.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

4) बाबा माझी जी ओळख आहे ती तुमच्यामुळे आणि मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे बाबा.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

5) बाप नावाच्या विद्यापीठात तुम्ही एकदा का शिस्त नावाचा अध्याय शिकला तर तुमचं आयुष्य सुखकर होतं.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

father's day
'फादर्स डे'निमित्त होणाऱ्या या स्पर्धेची लिंक तुम्हाला आली असेल तर सावधान !

6) हिरो हे केवळ टिव्हीच्या पडद्यावर नसतात

तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात बाबा.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

7) बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे.

म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

8) माझ्या आयुष्यात मी पाय घट्ट रोवून उभी आहे.

कारण माझ्या सोबत भक्कम आधार देणारा वडिलांचा खांदा आहे.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

9) मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा, आमच्या आयुष्यातील अमूल्य ठेवा आहे आमचा बाबा.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

10) आयुष्यात वडिलांनी मला एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला आहे . तो विश्वास मी सदैव तेजोमय ठेवण्याचा प्रयत्न करेल.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

father's day
Father's Dayच्या दिवशी बाबांना या गोष्टी देऊन करा खूश…

11) कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्हीच शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय बाबा.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

12) आयुष्यात कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती म्हणजे बाबा असतात.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

13) जगासाठी तुम्ही फक एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

14) तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा असतो.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

15) तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे. कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,

माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

father's day
हिंबा जमातीच्या महिला आयुष्यात एकदाच करतात अंघोळ…

16) बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,मुलांसाठी झटणारं अंतःकरण म्हणजे बाप

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

17) बाप नावाची साथ आयुष्यात असली की आयुष्य सुखकर होत.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

18) आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत

पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे.

म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

19) डोळ्यात न दाखवताही जो, आभाळा एवढं प्रेम करतो

त्याला वडील नावाचा राजा माणूस म्हणतात.

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

20) ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,

त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,

कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,

कारण बाप असतोच जीवनाचा आधार,

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा बाबा..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com