'या' पद्धतीने ओळखा ओरिजनल अन् बनावट केशरमधील फरक

ओरिजनल केशर कसं ओळखाल?
Learn more about why saffron is so expensive
Learn more about why saffron is so expensive
Updated on

कोणत्याही गोड पदार्थाची चव वाढवायची असेल तर त्यात सुकामेवा आवर्जुन घातला जातो. त्याचसोबत अनेकदा त्यात केशराच्या चार काड्याही घातल्या जातात. मात्र, केशर अत्यंत महाग आहे. त्यामुळे त्याची खरेदी करताना ते ओरिजनल आहे की नाही हे तपासून पाहणंदेखील तितकंच गरजेचं असतं. सध्या बाजारात वेगवेगळ्या दरामध्ये केसर सहज मिळतं. मात्र, तुम्ही खरेदी करत असलेलं केसर ओरिजनल आहे की बनावट हे तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, ओरिजनल केसर कसं ओळखावं ते पाहुयात (check purity of saffron in simple ways at home)

Learn more about why saffron is so expensive
आता घरीच करा इराणी चहा; जाणून घ्या, सिक्रेट रेसिपी

१. रंग -

ओरिजनल केशराचा रंग हा केशरी असतो. त्यामुळे केशर पाण्यात टाकल्यावर पाण्याला हलकासा पिवळसर रंग येतो. जर केशर पाण्यात टाकल्यावर पाणी पिवळ्या रंगाच झालं तर ते ओरिजनल केशर आहे समजावं. जर पाण्याला डार्क लाल किंवा केशरी रंग आला तर केशर बनावट आहे.

२. वास -

ओरिजनल केशराला मंद गोडसर वास येतो. ज्याप्रमाणे मधाला ठराविक गोडसर वास येतो अगदी त्याचप्रमाणे. परंतु, जर केशराला कडवट किंवा डार्क वास येत असेल तर ते बनावट केशर आहे समजावं.

Learn more about why saffron is so expensive
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतरही राहू शकते प्रेग्नंसी

३. पाणी, बेकिंग सोडा -

एका भांड्यात बेकिंग सोडा आणि पाणी यांची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये केसरच्या दोन काड्या टाका. जर या मिश्रणाचा रंग लाल किंवा केशरी आला तर ते बनावट केस आहे. आणि, जर मिश्रणाला पिवळा रंग आला तर ते ओरिजनल केशर आहे.

४. किंमत -

ओरिजन केशराची किंमत साधारणपणे हजार-१२०० च्या घरात असते. परंतु, त्यापेक्षा कमी किंमतीत तुम्हाला केशर मिळत असेल तर त्यात भेसळ करण्याची शक्यता अधिक असते.

५. चव-

ओरिजनल केशराचा वास जरी गोड असला तरीदेखील त्याची चव कडवट असते. त्यामुळे केशर खरेदी केल्यानंतर त्याच्या १-२ काड्या चावून पाहाव्यात. जर केशर गोड लागलं तर ते केशर बनावट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com