नातेसंबंधात गोडवा वाढविणारा ‘डे’; चॉकलेटची वाढली क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chocolate

प्रेम, आपुलकी आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ‘चॉकलेट डे’ मानला जातो. आपल्या जोडीदारांना, मित्रांना, प्रियजनांना, कुटुंबातील सदस्यांना चॉकलेट देऊन प्रेमाची, आपुलकीची देवाणघेवाण करतात.

Chocolate Day : नातेसंबंधात गोडवा वाढविणारा ‘डे’; चॉकलेटची वाढली क्रेझ

नागपूर - प्रेम, आपुलकी आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ‘चॉकलेट डे’ मानला जातो. आपल्या जोडीदारांना, मित्रांना, प्रियजनांना, कुटुंबातील सदस्यांना चॉकलेट देऊन प्रेमाची, आपुलकीची देवाणघेवाण करतात. नात्यात गोडवा मिसळण्यासाठी प्रेमवीर, विवाहित जोडपे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स खरेदी करतात आणि भेट देतात. रागावलेल्या, रुसलेल्या जोडीदाराला खूष करायचे असेल तर ‘चॉकलेट डे’ हा खास प्रसंग असू शकतो. या दिवशी भरपूर चॉकलेट्स भेट देऊन तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता.

‘चॉकलेट डे’ला जोडपी एकमेकांना चॉकलेट भेट देऊ शकतात. तसेच सुंदर आणि मधूर ‘रोमँटिक चॉकलेट डे’ संदेश पाठवू शकतात. तुमचा जोडीदार इतरत्र राहत असेल तर तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून मेसेज, वॉलपेपर, कविता इत्यादी पाठवू शकता. ‘व्हॅलेंटाइन वीक’मध्ये मोठ्या उत्साहात हा दिवस सेलिब्रेट केला जातो. नागपूरची तरुणाई सुद्धा ‘चॉकलेट-डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहे. शहरातील बाजार चॉकलेटच्या विविध व्हेरायटींनी सजले आहेत. तर, सोशल मीडियावर पूर्वसंध्येपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चॉकलेट खाण्याचे एक ना अनेक फायदे सुद्धा आहेत. चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइ आणि कॅफिनचे प्रमाण असते. त्याच्या सेवनाने मेंदूमध्ये आनंदाची भावना तयार करणाऱ्या एंडोर्फिनचा स्त्राव वाढतो. त्यामुळे तणाव कमी होऊन थकवा नाहीसा होतो.

चॉकलेट्सनी सजले बाजार

नागपूरचे बाजार चॉकलेटच्या विविध व्हेरायटींनी सजले आहेत. आकर्षक पॅकिंग असलेले चॉकलेट तरुणांना भूरळ घालत आहेत. एवढेच नाही तर कस्टमाईज्ड चॉकलेटला मोठी मागणी आहे. चॉकलेटवर आकर्षक रीतीने नाव लिहून ते आपल्या साथीदाराला भेट करण्याची ‘क्रेझ’ या वेळी खास ठरली आहे. एवढेच नाही तर चॉकलेट सोबत शुभेच्छा संदेश देणारे कार्ड्सनासुद्धा जोडप्यांची पसंती दर्शवली आहे.

असा साजरा करा चॉकलेट डे

  • पार्टनरकडे न जाता त्याला चॉकलेट पाठवून सरप्राईज द्या

  • त्याच्याशी संबंधित एक गोड संदेशही तुम्ही त्याबरोबर पाठवा

  • अनेकजण घरीच चॉकलेट तयार करुण आपल्या साथीदाराला गिफ्ट करतात

  • चॉकलेट ऐवजी त्या फ्लेवरचा केकसुद्धा तयार करू शकता

चॉकलेट खाण्याचे फायदे

  • हृदयाचे आरोग्य राखण्यास चॉकलेट फायदेशीर

  • डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करतात

  • रक्त गोठण्याचा धोका कमी होऊन  हृदयातील रक्ताभिसरण वाढवितात

  • सतेज त्वचेसाठी चॉकलेट उपयुक्त