Christmas 2023 : लखनऊमध्ये आजही आहे ऐतिहासिक ब्रिटीशकालीन चर्च, जाणून घ्या इतिहास

या चर्चची रचना रॉयल इंजिनिअर्स ग्रुपने केली होती
Christmas 2023
Christmas 2023esakal

Christmas 2023 :

नाताळला अवघे काही दिवस उरले आहेत. या दिवशी प्रत्येकजण चर्चला भेट देण्याची योजना आखतो. भारतात अशी अनेक चर्च आहेत जे ख्रिसमसच्या दिवशी विशेष पद्धतीने सजवले जातात. भारतातील अनेक प्राचिन चर्च देखील डोळे दिपवणाऱ्या लाईट्सनी सजवलेले असतात. हे दृश्य खरोखरच पाहण्यासारखे आहे. पण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला लखनऊच्या चर्चचा इतिहास सांगणार आहोत.

असे मानले जाते की, हे चर्च ब्रिटिशांनी बांधले होते. लखनऊच्या या चर्चची संपूर्ण माहिती आम्ही आजच्या लेखात देणार आहोत. 1860 मध्ये बांधकाम पूर्ण झालेले हे चर्च बोटीच्या आकाराचे आहे. 1857 च्या क्रांतीपूर्वी येथे तीन चर्च होते. पण ते युद्धात नष्ट झाले.

त्या वेळी इंग्रजांना प्रार्थनेसासाठीही जागा उरली नव्हती. म्हणून त्यांनी नवीन चर्च स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नव्या चर्चमुळे प्रार्थना आणि नाताळचे उत्सव जल्लोषात साजरे केले जाऊ लागले.

Christmas 2023
Christmas 2023 : ख्रिसमस सजावटीसाठी वापरले जाणारे रंग देतात 'हा' खास संदेश

इंग्रज ख्रिश्चनांनी येथे दोन वर्षे नियमित प्रार्थना सभा घेतल्या. या चर्चची रचना रॉयल इंजिनिअर्स ग्रुपने केली होती. हे चर्च तेव्हा 'ब्रिटिश हुतात्मा स्मारक' म्हणूनही ओळखले जात होते. येथे चर्चमध्ये तुम्हाला १८५७ च्या क्रांतीत मारले गेलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे, वाढदिवस, मृत्यूच्या तारखा सापडतील.

लखनऊमधील सर्वात जुने चर्च कोठे आहे

असे मानले जाते की शहरातील पहिले चर्च दालीगंजमध्ये बांधले गेले होते. मात्र जागेची कमतरता असताना १८६० मध्ये हजरत गंजची जमीन घेण्यात आली. काही काळ ही मंडळी छोट्या स्वरूपातच चालवली जात होती. पण 1987 मध्ये पुन्हा त्याची रचना करण्यात आली.

Christmas 2023
Christmas 2023: येशू जन्माचा जल्लोष! चर्चवर आकर्षक रोषणाई अन् सजावट, थीम केकसह भेटवस्तूंना मागणी

चर्च बोटीच्या आकारात का बांधले गेले?

बोटीच्या आकाराचे हे चर्च भारतीय आणि इटालियन वास्तुविशारदांच्या विचारसरणीची साक्ष देणारे आहे. या आकारात चर्च बांधण्याचे कारण स्वर्गाशी संबंधित आहे. या बोटीत बसूनच भगवंताचा मार्ग व्यापला जाईल, असा संदेश हा आकार लोकांना देतो. फक्त ही बोट आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल. सामाजिक कार्यातही त्याची भूमिका असते.

गरीब कुटुंबातील मुलांची फी माफ करण्याबरोबरच ते अनाथाश्रमातही मदत करतात. तसेच, या नाताळदिवशी होणाऱ्या सोहळ्यात प्रत्येक धर्म, जात आणि पंथाचे लोक सहभागी होतात. हा ख्रिसमस सेलिब्रेशन नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपर्यंत चालतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com