Cloth Stain Removal : कपड्यांवरील हट्टी डाग निघेनात?; उद्या सकाळीच प्रयोग करा, फरक पहा!

मशीनमध्ये कसे निघतील कपड्यांवरचे डाग
Cloth Stain Removal
Cloth Stain Removalesakal

Cloth Stain Removal : कोरी करकरीत पांढरी कपडे घातलेला कोणीही व्यक्ती रूबाबदारच दिसतो. लग्न, समारंभात तर हमखास पांढरी कपडे घातली जातात. पांढऱ्या कपड्यांची बातही कुछ और है, असं प्रत्येकाला वाटतं. पण, जेव्हा या पांढऱ्या कपड्यांवर डाग पडतात तेव्हा अनेकांचा जीव हळहळतो.

या डागांमुळेच लोक पांढरे कपडे घालणे खूप टाळतात. कारण त्यावर काही डाग पडले तर ते दूर करणे कठीण होते. पांढर्‍या कपड्यांवर डाग लपवणे तसे अवघडंच. त्यामुळे ते न लपवता डाग कसे दूर होतील याची माहिती घेऊयात.

पांढऱ्या कपड्यांवर बर्‍याच वेळा भाज्या, सॉस, लोणचे, चहा, कॉफी इत्यादी कपड्यांवर पडतात. हे डाग काढणे एखाद्या कामापेक्षा कमी नाही. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही तुमच्या पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करू शकाल आणि त्यांची चमकही टिकून राहील.

Cloth Stain Removal
Clothes Cleaning Tips : लिंबू, टुथपेस्ट अन् बरंच काही! आता कपड्यांवरचे हळदीचे डाग होणार दूर!

पांढऱ्या कपड्यांवरील डाग कसे काढायचे

मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला हायड्रोजन पेरोक्साइड सहज मिळेल. पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी डागांवर हायड्रोजन पेरॉक्साइड चोळा आणि नंतर साबण आणि हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्याच्या बादलीत काही काळ ठेवा.

२ ते ३ तासांनी कापड चोळताना कोमट पाण्याने धुवावे. तुमच्या लक्षात येईल की डाग हलका झाला आहे किंवा नाहीसा झाला आहे. जर डाग नाहीसा झाला नाही तर आपण ते पुन्हा वापरू शकता.

लिंबू आणि सोडा

पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोडाचा वापरही प्रभावी ठरतो. यासाठी 1 चमचे खाण्याचा सोडा आणि 1-2 चमचे लिंबाचा रस एकत्र करून डागावर लावा आणि चांगले घासून घ्या. यानंतर काही काळ ठेवा. 40 ते 50 मिनिटांनंतर कापड बाहेर काढून कोमट पाण्याने धुवा, त्यामुळे डाग सहज निघून जाईल.

अल्कोहोल

कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी अल्कोहोल लावा. यासाठी अल्कोहोलमध्ये लिंबू मिसळा आणि डागांवर लावा आणि ब्रश किंवा हाताने चांगले घासून घ्या. काही वेळ डागावर ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. तुमचे कपडे डाग हलके करतील. (Clothes)

Cloth Stain Removal
Cloth Business : तयार कापडाच्या मागणीत घट; उत्पादन कपात निर्णयामुळे यंत्रमाग 2 दिवस बंद

मशीनमध्ये कसे निघतील कपड्यांवरचे डाग

वॉशिंग मशीन कितीही महाग असले तरी त्यात सगळेच कपडे स्वच्छ होतात असे नाही. त्यामुळे मशीन वॉशनंतरही अनेकवेळा कपडे तसेच घाण राहतात.

तुमचे पांढरे कापड दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात भिजवा. कापड पूर्णपणे भिजल्यानंतर कापड वेगळे घ्या आणि चांगले पिळा. त्यानंतर वॉशिंग मशिनमध्ये टाका आणि वॉशिंग पावडर आणि थोड्या शॅम्पूने धुवा. यामुळे डाग नाहीसे होतील आणि कपडे चमकतील.

कपडे धुण्यासाठी आपण जी पावडर वापरतो ती कपड्यांवरील डाग सहज काढून टाकते. त्याचप्रमाणे शॅम्पू कपड्यांचा पोत न बदलता फक्त घाण काढून टाकतो आणि कपडे नेहमी नवीन दिसतात. (Kitchen Hacks)

Cloth Stain Removal
Cloth Bags : मशिनमध्ये नाणे टाकून घ्या कापडी पिशव्या !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com