Hair Care : घरातलं 'हे' तेल आहे 'फोर इन वन', केसांच्या समस्या होतात छू मंतर

तिळाचे तेल केसांसाठी उत्तम असते. त्यात असणारे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. बॅक्टेरिया काढून टाकून टाळूला निरोगी ठेवतात.
Hair Care : घरातलं 'हे' तेल आहे 'फोर इन वन', केसांच्या समस्या होतात छू मंतर
Updated on

Common Hair Problems : हिवाळ्यात केसांच्या, त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशात प्रत्येक घरात असणारं तीळाचं तेल ठरतं अत्यंत उपयुक्त. तिळाचे तेल केसांसाठी उत्तम असते. त्यात असणारे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. बॅक्टेरिया काढून टाकून टाळूला निरोगी ठेवतात. शिवाय याच्या वापराने तुम्हाला केसांच्या काही कॉमन समस्यांपासून मुक्ती मिळते. आपल्या केसांसाठी तिळाच्या तेलाचे फायदे आणि ते कसे वापरावे ते जाणून घेऊया.

तिळाच्या तेलात असतात हे गुण

तिळाच्या तेलात अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल गुणधर्म असतात. यासोबतच तिळाच्या तेलाच्या वापराने केसांची वाढ होते, केस दाट, काळे आणि मजबूत राहतात.

Hair Care : घरातलं 'हे' तेल आहे 'फोर इन वन', केसांच्या समस्या होतात छू मंतर
Hair Care : आजीबाईच्या बटव्यातच आहेत केसांच्या सर्व समस्यांचा उपाय

तिळाचे तेल केसांच्या या ४ समस्यांपासून आराम देऊ शकते

1. डँड्रफ पासून आराम

हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होणे ही सर्वात सामान्य समस्या आहे. कारण थंडीत वाहणारे थंड वारे केसांचा ओलावा काढून घेतात. त्यामुळे केस कोरडे होतात आणि कोंड्याची समस्या वाढते. अशावेळी तिळाचे तेल तुम्हाला मदत करू शकते.

Hair Care : घरातलं 'हे' तेल आहे 'फोर इन वन', केसांच्या समस्या होतात छू मंतर
Hair Care : थंडीत केस गळण्याची समस्या वाढलीय ना ? हे उपाय करा

2. अकाली पांढरे होणाऱ्या केसांपासून मुक्तता

आजच्या काळात अनहेल्दी डायट आणि तणावामुळे केस अकाली पांढरे होतात. अशा वेळी तिळाच्या तेलाने मसाज केल्याने तुम्ही तुमचे केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवू शकता. त्यात आढळणारे अँटी ऑक्सिडंट्स तुम्हाला मदत करतात.

Hair Care : घरातलं 'हे' तेल आहे 'फोर इन वन', केसांच्या समस्या होतात छू मंतर
Hair Care: नखे एकमेकांना घासल्याने खरंच केसांची वाढ होते काय? वाचा बाबा रामदेव यांनी केलेला दावा...

3. हेअर फॉल पासून आराम

केस गळणे ही एक मोठी समस्या आहे. जेव्हा केस कोरडे आणि निर्जीव असतात तेव्ही ही समस्या गंभीर होते. हिवाळ्यात केसांची आर्द्रता कमी होते. त्यामुळे केस अधिक तुटायला लागतात. अशावेळी तिळाचे तेल तुमच्या केसांना पोषण देते आणि केस गळतीपासून मुक्ती मिळते.

4. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त

तिळाचे तेल केसांना मऊ आणि चमकदार तर बनवतेच पण ते केसांना पोषणही देते. तिळाच्या तेलात आढळणारे प्रथिने, फॅटी अॅसिड आणि इतर पोषक घटक तुमच्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. हे सर्व पोषक तुमच्या केसांची वाढ वाढवतात तसेच त्यांना मजबूत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com