esakal | 9 तास गाढ झोपेसाठी मिळणार 10 लाख? एका कंपनीची भन्नाट ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

sleep

9 तास गाढ झोपेसाठी मिळणार 10 लाख? एका कंपनीची भन्नाट ऑफर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : जर समजा तुम्हाला काहीही न करता तुमच्या गाढ झोपेसाठी पैसे मिळाले तर... ते पण १० लाख...बसला ना आश्चर्याचा धक्का...होय हे खरं आहे. भारतातील एक कंपनी अशी आहे, जी फक्त तुम्हाला झोपण्यासाठी तब्बल दहा लाख रुपये मिळवून देते. आणि याची स्पर्धा सुध्दा भरविण्यात येते..काय आहे नेमकी ऑफर?...(company-gives-ten-lakh-for-9-hours-of-sleep-jpd93)

9 तास गाढ झोपण्यासाठी तब्बल 10 लाख रुपये

ही कंपनी आहे भारतातील बंगळूरुमध्ये. स्लीप अँड हाऊस सॉल्युशन असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीत केवळ 9 तास गाढ झोपण्यासाठी तब्बल 10 लाख रुपये दिले जातात. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमानुसार सलग 100 रात्री दररोज 9 तास गाढ झोप घ्यावी लागणार आहे. दररोज रात्री वेळेवर येऊन झोपणे हे काम स्पर्धकाला करायचे आहे. स्पर्धकांना व्यवस्थित गाढ झोप यावी यासाठी कंपनीने योग्य सोयीचीही काळजी घेण्यात येते. दरम्यान वेकफिटची गादी आणि एक उत्तम स्लीप ट्रॅकर देण्यात येईल. त्याचप्रमाणे कंपनीकडून स्पर्धकाच्या झोपेचे निरिक्षणही करण्यात येते. ही कंपनी दरवर्षी इंडियन स्लिप चॅम्पियन पुरस्काराची घोषणा करते. त्यासाठी कंपनी दरवर्षी एक स्लीप इंटर्नशिप कार्यक्रम राबवते. या इंटर्नशिपमध्ये जिंकणाऱ्याला कंपनीकडून 10 लाख रुपये बक्षिस देऊन त्याला इंडियन स्लिप चॅम्पियन पुरस्काराने गौरवण्यात येते. तसेत भाग घेणाऱ्याला १ लाख रुपये दिले जातात. लोकांनी चांगली झोप घ्यावी यासाठी या कार्यक्रमातून लोकांना प्रोत्साहित केले जाते.

हेही वाचा: मॉर्निंग स्कीन रुटीनमध्ये नाराळाच्या पाण्याचा होतो वापर; काही खास टिप्स

हेही वाचा: त्वचा व सौंदर्य चिरतरुण ठेवायचे असेल 'हे' कराच!

loading image