- सोनम म्हसवेकर आणि अजित साबळे
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘देव माणूस - मधला अध्याय’ मालिकेतील ‘लाली’ म्हणजेच सोनम म्हसवेकर आणि तिचा खास मित्र अजित साबळे, यांची मैत्री ही त्या दोघांच्या अभिनय प्रवासाइतकीच सुंदर आणि मनमोकळी आहे. पुण्याच्या ललित कला केंद्रात सुरू झालेलं त्यांचं नातं, आज गहिऱ्या विश्वासात आणि निर्मळ आठवणीत रुजलेलं आहे.