esakal | 'चालती हो'; व्हॅक्सिन घेताना नखरे करणाऱ्या मुलीला डॉक्टरांनी सुनावलं

बोलून बातमी शोधा

'चालती हो'; व्हॅक्सिन घेताना नखरे करणाऱ्या मुलीला डॉक्टरांनी सुनावलं
'चालती हो'; व्हॅक्सिन घेताना नखरे करणाऱ्या मुलीला डॉक्टरांनी सुनावलं
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं (corona)प्रत्येकाच्या डोक्यावर घोंगावत आहे. आतापर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर, अनेकांचे यामुळे मृत्यूदेखील झाले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून या विषाणूचं संक्रमण वाढलं असून दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. १ मे पासून राज्यात १८ वर्षांवरील तरुणांचंदेखील लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर व्हॅक्सिन (vaccine) घेणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हॅक्सीन घेतांना उगाच आरडाओरडा केल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर तिच्यावर चिडले आणि निघून जा असं थेट त्यांनी तिला सांगितलं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेक जण हसू हसून बेजार झाले आहेत. विशेष म्हणजे व्हॅक्सिन(vaccine) घेतांना या मुलीचा नाटकी अंदाज पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा: 'मुलांना बेकायदेशीरित्या दत्तक घेणे कायद्याने गुन्हा'

या व्हिडीओमध्ये एक मुलगी लसीकरणासाठी रुग्णालयात गेली होती. मात्र, डॉक्टरांच्या हातात इंजक्शन पाहून ती प्रचंड घाबरली आणि मोठमोठ्या ओरडू लागली. तिचं सातत्याने ओरडणं पाहून डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचारीदेखील त्रस्त झाले होते. त्यामुळे या मुलीसोबत आलेल्या मुलाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील तिचं ओरडणं काही केल्या थांबत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यावर 'मम्मीचं नाव घेऊ शकते का?', असा प्रश्न तिने डॉक्टरांना विचारला. विशेष म्हणजे वैतागलेल्या डॉक्टरांनी 'शांत रहा, काही बोलू नकोस', असा सज्जड दम भरला आणि इंजक्शन दिलं. इतकंच नाही तर, 'चल, चालती हो इथून', असं रागाच्या भरातही डॉक्टर तिला म्हणाले.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान चर्चेत आला असून अनेकांनी या मुलीला ट्रोल केलं आहे. मुद्दाम खोटी नाटकं करत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर, उगाच ओव्हरअॅक्टिंग करते असंही काहींनी म्हटलं आहे.