

Never Leave These Things Inside Your Car | Car Safety Tips
sakal
जानेवारीच्या थंडीत गाडीची काच धुक्याने झाकली जाते, पावसाळ्यात कारमध्ये ओलावा आणि दुर्गंधी वाढते, तर उन्हाळा सुरू झाला की पार्क केलेली गाडी काही मिनिटांतच भट्टीसारखी तापते. भारतात प्रत्येक ऋतू गाडीची वेगवेगळी परीक्षा घेतो, पण एप्रिल, मे आणि जून महिन्यातील कडक ऊन सर्वात जास्त धोकादायक ठरू शकते. अनेकजण नकळत मोबाईल, पॉवर बँक, पाण्याच्या बाटल्या किंवा औषधे गाडीतच ठेवतात; मात्र वाढते तापमान या साध्या वस्तूंनाही धोकादायक बनवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात गाडीत कोणत्या वस्तू अजिबात ठेवू नयेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.