Datta Jayanti 2023 : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! दत्तगुरूंचे सोळा अवतार कोणते?

दत्त महाराजांच्या या अवतारांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही
Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023 esakal

Datta Jayanti 2023 :

दत्त सांप्रदायातील दत्त भक्तांसाठी महत्वाचा मानला जाणारा दिवस म्हणजे दत्त महारांचा जन्मोत्सव होय. यंदा २६ डिसेंबर रोजी हा दिव्य सोहळा पार पडणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजता देवांचा जन्मकाळ साजरा होतो. दत्तांच्या मंदिरात भक्तांची गर्दी होते. श्री क्षेत्र नृसिहवाडी, पावन क्षेत्र औदुंबर या ठिकाणी तर भक्तांचा महापूर उसळतो.  

श्री गुरूदेव दत्त हे महाराष्ट्रासह विविध राज्यातील प्रमुख दैवत मानले जाते. श्री दत्तात्रय हे सर्व सिद्धी प्रदान करणारे तसेच मोक्ष प्राप्ती करून देणारे दैवत आहे. गुरू दत्तांनी वेगवेगळ्या अवतारांमध्ये भारत भ्रमण केलं.

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023 : घरात पाण्याच्या झऱ्यात सापडली सोन्याची दत्तमूर्ती, वजन शुन्य असूनही सहज उचलणे अशक्यच

अगदी साध्या वेषात दत्तात्रय भ्रमंती करायचे, औंदुंबराच्या छायेत नदीकाठी ध्यानाला बसायचे. दत्त गुरूंच्या अवतारांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. दत्तांचे अवतार कोणते याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

पहिला अवतार - ब्रह्मदेवाचे मानसपुत्र 'अत्रि' हे पुत्रप्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात् भगवान कार्तिक शुद्ध १५ स प्रकट झाले. त्यांचे रूप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करून लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.

दुसरा अवतार - अत्रिऋषींनी ऋक्ष पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरिता 'अत्रिवरद' या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रींपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रींना वाटले. तेव्हा ते म्हणाले, "तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे." या अत्रिवरदाचे रूप तप्त सुवर्णकान्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षड्भुज होते. (जन्म : कार्तिक कृष्ण प्रतिपदा).

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2022: श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे?

तिसरा अवतार - अत्रिवरदाने अत्रिऋषींना वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रिंनी मागितला. त्यावर 'तथास्तु' म्हणून बालरूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले. ते दिगंबर रूप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते. मुख चंद्राप्रमाणे व हात चार होते. हाच दत्तात्रेयांचा 'दत्तात्रेय' नामक तिसरा अवतार. (जन्म : कार्तिक कृष्ण २).

चौथा अवतार - यानंतर आपणास औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करू लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रूप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास 'कालाग्निशमन' हे नाव पडले. (जन्म: मार्गशीर्ष शुद्ध १५).

पाचवा अवतार - या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषी, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयांनी आपल्या बालरूपाचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले. हा अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे. (जन्म मार्गशीर्ष शुद्ध १५)

सहावा अवतार - दत्तात्रेयांचा सहावा अवतार 'लिलाविश्वंभर' ज्या वेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते व राज्यकर्त्यांकडून लुबाडणूक झाल्यामुळे हैराण झाले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला. (जन्म: पौष शुद्ध १५) (Datta Jayanti)

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2022 : दत्त महाराजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तूम्ही पाहिल्यात का?

सातवा अवतार - भ्रमंतीत एकदा वत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रूप धारण केले आणि अनेक चमत्कार करून सिद्धांचे गर्वहरण केले व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा 'सिद्धराज' नावाचा सातवा अवतार. (जन्म : माघ शुद्ध १५)

आठवा अवतार - सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटविण्यासाठी दत्तात्रेयांनी रूपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील 'ज्ञानसागर' नावाचे रूप धारण केले. (जन्म: फाल्गुन शुद्ध १०)

नववा अवतार - पुढे आणखी एकदा सिद्धांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला. (जन्म : चैत्र शुद्ध १५)

दहावा अवतार - भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रद्धा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी 'मायामुक्तावधूत' या नावाचा दहावा अवतार घेतला. (जन्म : वैशाख शुद्ध १४)

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2022 : जेव्हा इब्राहिम अली या भक्ताला दत्तगुरूंनी राजा होण्याचा वर दिला…!

अकरावा अवतार - दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रूप सावळे व सुंदर होते. (जन्म : ज्येष्ठ शुद्ध १३)

बारावा अवतार - दत्तात्रेयांचा बारावा अवतारं 'आदिगुरू' या नावाने प्रसिद्ध आहे. मदालसेचा पुत्र 'अलर्क' यास योगाचा व तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला. (जन्म : आषाढ शुद्ध १५)

तेरावा अवतार - एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा 'शिवरूप' नावाचा तेरावा अवतार. (जन्म : श्रावण शुद्ध ८)

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2022: दत्त जयंतीला मनोभावे दत्ताची आराधना करून, सुख-समृद्धी 'हे' उपाय करा..

चौदावा अवतार - दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे. (जन्म : भाद्रपद शुद्ध १४)

पंधरावा अवतार - दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार 'दिगंबर' या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्रीदत्तदिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला. (जन्म : अश्विन शुद्ध १५)

सोळावा अवतार - 'कमललोचन' नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले. (जन्म : कार्तिक शुद्ध १५)

(संबंधित माहिती गोखले ग्रंथ प्रकाशनाच्या राजकुवर आ.सरनोबत लिखित प्रमुख दत्त क्षेत्रे या पुस्तकातून घेण्यात आली आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com