Datta Maharaj Temple : कोल्हापुरातल्या या मंदिरात आहे एक मुख अन् सहा हात असलेली दत्त मूर्ती

मंदिराची अख्यायिका आहे वेगळीच
Datta Maharaj Temple
Datta Maharaj Templeesakal

Datta Maharaj Temple :  

आजवर तुम्ही दत्त महाराजांच्या पादूका, दत्त महाराजांचे त्रिमुर्ती रूप पाहिले असेल. जसं बेलाला पाने तीन तसं दत्त महाराजांना तीन मुख असं लहान मुलांनाही पटकन सांगता येतं. पण, दत्त महाराजांची लिला अगाध आहे.

दत्त महाराजांचे असे एक मंदिर आहे. जिथे मूर्तीला हात सहा आहेत पण मुख केवळ एकच आहे. आज गुरूवार आणि लवकरच दत्त जयंती साजरी होणार आहे. त्यामुळेच आपण कोल्हापुर शहरातल्या एका अनोख्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

Datta Maharaj Temple
Datta Maharaj Temple: भक्ताचा अपमान होण्यापासून थांबवण्यासाठी दत्तगुरू नरसोबाच्या वाडीहून गोव्याला गेले!

हे मंदिर कोल्हापुर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात शेणगाव या गावी हे दत्त मंदिर आहे. कोल्हापूरपासून ५५ किलमीटर अंतरावर असणारे हे श्री दत्त मंदिर वेदगंगा नदी तिरावर वटवृक्ष, औदुंबर आणि चिंच यासारख्या वृक्षांच्या गर्द छायेत वसले आहे. या मंदिरात अन्यत्र कोठेही नसलेली एकमुखी सहा कर (हात) असलेली श्री दत्त मूर्ती अत्यंत सुबक अशी आहे.

या शिवाय मंदिरात षण्मुख अथवा कार्तिकेयस्वामी यांची उत्तर भारतात अभावाने आढळणारी मूर्ती आहे. महिलांना या मूर्तीच्या दर्शनाची परवानगी नसल्याने मंदिराच्या एका छोट्या झरोक्यातूनच या मूर्तीचे दर्शन व्हावे, अशी रचना केलेली आहे. 

मंदिराची अख्यायिका

आख्यायिका अशी आहे की दृष्टांत झाल्यामुळे श्री दत्तभक्त बालमभट्ट पैठणकर हुबळीहून सहकुटुंब शेणगावपर्यंत चालत आले. पैठणकरांना दृष्टांतात दत्तगुरुंनी आज्ञा केली की तू जेथे दक्षिणोत्तर नदी वाहते व गर्द वनराई आहे. तेथे माझे स्थान आहे तेथे तू जावून माझी सेवा कर. त्याप्रमाणे ते सहकुटुंब चालत चालत अशा क्षेत्रांची पहाणी करत असताना श्रींनी सांगितलेले क्षेत्र आढळले ते म्हणजे शयनग्राम (म्हणजेच शेणगाव) होय.

Datta Maharaj Temple
Datta Dalvi Arrest : ठाकरेंना मोठा धक्का, माजी महापौरांना अटक, मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

महाराष्ट्राच्या विविध भागात श्री दत्त जयंती उत्सव साजरा होतो. त्याप्रमाणेच, शेणगाव येथील श्री दत्तजयंती उत्सवाची महती आगळी-वेगळी अशी आहे. हे जागृत देवस्थान आहे. वर्षाचे बाराही महिने येथे भाविकांची रिघ असते. प्रत्येक गुरुवारी तर या ठिकाणी भक्तीचा मेळा असतो. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी अनेक भाविक येथे नवस बोलतात. इच्छा पूर्ण झाल्या की नवस फेडतात.

मंदिरातील दत्तमूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण एकमुखी व सहा हात असणारी अशा स्वरूपाची मूर्ती अन्यत्र कोठेही नाही. नारायणपूर (पुणे) येथे असणारी मूर्ती एकमुखी आहे पण अलिकडेच बनवण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र शेणगाव येथील मूर्ती प्राचीन आहे. ग्रामीण संस्कृती, परंपराचे हे श्री दत्त मंदिर प्रतीक आहे.

Datta Maharaj Temple
Datta Dalvi: ठाकरे-शिंदे वाद पेटला? दत्ता दळवींच्या गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड

या परिसरात सदैव भाविकांची वर्दळ असते. मंदिराच्या मागे पुजारी निवास मंदिर आहे. जवळच असणाऱ्या गिरीगोसावी समाजाच्या वस्तीत असणाऱ्या मठात धुम्रगिरी महाराजांची समाधी अन्य बुवांच्या समाध्या या संपूर्ण परिसराची भव्यता अधोरेखीत करतात. शेणगावातील कोणत्याही शुभकार्याचा शुभारंभ या मंदिरातूनच होतो. 

महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब येथे सांगाविशी वाटते. वेदगंगा पूर्व-पश्चिम दिशेने वाहते. मात्र या तीर्थक्षेत्राच्या परिसरापुरती नदी दक्षिणोत्तर वाहते आणि त्यामुळेच येथे शुक्लतीर्थ आहे. यामुळे दत्त तीर्थक्षेत्री शुक्लतीर्थ असावे हा संकेत पूर्ण होतो. मंदिराची उभारणी अंदाजे २०० ते २५० वर्षांपूर्वी झालेली असावी. मंदिर प्राचीन असल्याने निश्चित कालखंड सांगता येत नाही. येथील काही दगडांवर १८२७ सालाचा उल्लेख आढळतो तर काहींवर फक्त खाणाखुणा आढळतात.

Datta Maharaj Temple
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? 'त्या' वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com