Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? 'त्या' वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी

indurikar maharaj
indurikar maharajesakal

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतता. मात्र अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात PCPNDT कलमांतर्गत दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे, ज्याकेडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रकरण का आहे?

२०२० साली इंदुरीकर महाराजांनी अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. २०२० साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता देखील करण्यात आली.

indurikar maharaj
Explained : Deepfake व्हिडिओबाबत IT कायदा काय सांगतो? कायदा असूनही रश्मिका मंदाना का बळी ठरली?

मात्र या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला. पुढे तोच आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे.

मागील महिन्यात समन्स बजावून देखील इंदुरीकर महाराज सुनावणीला गैरहजर राहिले. दरम्यान आजच्या सुनावणीला ते कोर्टात हजर राहणार का, ते पहावे लागणार आहे.

indurikar maharaj
Bhujbal Maratha Reservation: मंत्री छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तात वाढ; मराठा-ओबीसी आरक्षणावरून तणावाचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com