सणासुदीचे दिवस आले, की सगळं वातावरण आनंद आणि उत्साहानं भरून जातं. या काळात घरही जितकं छान, सुंदर आणि कल्पक दिसेल तितका सणाचा आनंद द्विगुणित होईल. त्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया..प्रवेशद्वाराची सजावटपहिली छाप महत्त्वाची असते. त्यामुळे सणांच्या निमित्तानं आपल्या घरात येणाऱ्यांना घर सुंदर दिसलं पाहिजे. दारावर छान नवीन तोरणं लावू शकता. फुलांची, पानांची तोरणं तयार करू शकता किंवा रंगीबेरंगी कागदाची तोरणंही तयार करून वातावरणनिर्मिती करता येईल.दिव्यांची माळ : एलईडी लाइट्स किंवा डिझायनर दिव्यांच्या माळांचा वापर करू शकता.रांगोळी : रंगीत साहित्य वापरून सुंदर रांगोळी तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करते..घरातील भिंती आणि कोपरे सजवाथीम-बेस्ड वॉल डेकोर : त्या त्या सणांनुसार दिवे, कागदी वस्तू, पुठ्ठे यांचा वापर करून छान कॉर्नर डेकॉर तयार करता येईल.भिंतीचे स्टिकर्स : बाजारात मिळणाऱ्या स्टिकर्सचा वापर करा किंवा स्वतः कागदावर डिझाइन काढून चिकटवा..फुलांची आणि दिव्यांची सजावटगुलाब, मोगरा, झेंडू यांसारख्या सुगंधी फुलांचा वापर करा.खिडक्यांवर, पलंगाभोवती किंवा फर्निचरवर नाजूक LED लाइट्स लावा.बाटल्यांमध्ये दिवे ठेवून सेंटर पीस तयार करा..टेबलाची सजावटसणांच्या निमित्तानं लोक एकत्र येतात. जेवण हा त्यातला महत्त्वाचा भाग. त्यासाठी जेवणाच्या टेबलवर त्या सणानुसार थीम-बेस्ड टेबल सेटअप करता येईल. दिवे, फ्लॉवरपॉट, देवतांच्या धातूंच्या मूर्ती, टेबलक्लॉथ, धार्मिक साहित्य यांचा कल्पक वापर करून वातावरणनिर्मिती करता येईल.पूजेचे ठिकाणज्या ठिकाणी पूजा होणार आहे, ते देवघर किंवा इतर कुठलं स्थान अतिशय सुंदर बनवा. फुलांच्या माळांपासून रेशमी कापड, छोट्या घंटा, आरतीची सुशोभित ताटं, देवतांची चित्रं, मूर्ती यांचा छान वापर करा. पारंपरिक दिवे, मातीची दिवे यांची छान आराससुद्धा करता येईल..बाल्कनी आणि बाहेरील भागाची सजावटबाल्कनीत दिवे, दिव्यांच्या माळा लावू शकता. आकाशकंदिलांचाही छान वापर करता येईल. बाल्कनीमध्ये मातीचे दिवे लावून उत्सवी वातावरण निर्माण करता येईल.जुन्या वस्तूंचा पुनर्वापरबाटल्यांचे आकर्षक फ्लॉवरपॉट्स, जुन्या साड्यांच्या कापडांपासून कुशन कव्हर्स, कागदी सजावट यांचा कल्पक वापर करून तुम्हाला तुमची सर्जनशीलताही दाखवता येईल..खास टचसुगंधी अगरबत्ती/ सेंटड कँडल्स – वातावरणात सुगंध भरतात.फेस्टिव्ह म्युझिक – पारंपारिक गाणी वाजवत उत्सवी मूड तयार करा.सहकुटुंब फोटोंचा डिस्प्ले – जुन्या आठवणी सजवा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.