- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
शांत मन आणि तल्लख बुद्धी या आपल्या दोन सुपर पॉवर्स आहेत. मागील लेखात आपण बघितलं, की आपल्या रोजच्या रूटिनमध्ये आपल्या मनाचा शांत आणि प्रसन्न भाव कसा जोपासावा, आपलं मन स्वस्थ कसं ठेवावं. आज आपण तल्लख बुद्धी या आपली दुसऱ्या सुपरपॉवरबद्दल थोडं बोलूयात.