esakal | उन्हाळ्यात ट्राय करा डेनिम वेअर! दिसाल क्लासी आणि स्टाईलिश
sakal

बोलून बातमी शोधा

denim

उन्हाळ्यात ट्राय करा डेनिम वेअर! दिसाल क्लासी आणि स्टाईलिश

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आजच्या फॅशन ट्रेंडमध्ये आरामदायक कपडे सर्वाधिक लोकप्रिय आहेत, म्हणून जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा बॅगी जीन्स, स्लोकी आणि रिलॅक्स जीन्स किंवा सुपर-वाईड पँट यांना या सीझनमध्ये सर्वात जास्त मागणी आणि फॅशनेबल असतात. हे आपल्याला स्टाइलिश लुकच देत नाहीत तर आरामही देतात. अशातच शक्यतो वातावरणानुसारच कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा. जर या उन्हाळ्यात उन्हापासून सुटका करण्यासोबतच स्टायलिशही दिसायचं असेल तर तुम्ही सध्या ट्रेडिंगमध्ये असणारा डेनिम लूक फॉलो करू शकता.डेनिम तुम्ही कॉलेज किंवा ऑफिस कुठेही वेअर करू शकता. सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही सर्रास डेनिम लूक कॅरी करताना दिसतात. अशातच आज आम्ही तुम्हाला काही डेनिम वेअर्सबाबत सांगणार आहोत. "

क्लासी लूकसाठी तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये डेनिम शॉर्ट फॅन्ट्सचाही समावेश करू शकता.

उन्हाळ्यामध्ये डेनिम शर्टही वेअर करू शकता. डेनिम शर्ट या वातावरणात आरामदायक असण्यासोबत क्लासी लूक देण्यासही मदत करते

उन्हाळ्यात कम्फर्टेबल आणि क्लासी लूकसाठी तुम्ही डेनिमचा मिडी स्कर्ट ट्राय करू शकता. बाजारातही अनेक ट्रेन्डी मिडी स्कर्ट्स उपलब्ध आहेत

उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी डेनिम जॅकेट कॅरी करू शकता. या जॅकेटमुळे स्टायलिश लूकसोबतच उन्हापासूनही बचाव होईल.

डेनिम जीन्स तुम्ही कधीही आणि कुठेही वेअर करू शकता. परंतु उन्हाळ्यामध्ये डेनिम जीन्स फार कम्फर्टेबल ठरते

loading image