Monsoon Health Care : पावसाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी! जीवनशैलीत करा हे बदल...

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजेत हे जाणून घ्या.
health care
health caresakal

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय, या ऋतूसोबत विविध आजारपण देखील डोकं वर काढतात, त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहारासोबत काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक असतं. पाऊस म्हटला तर गरमीपासून सुटका तर होतेच. मात्र बरेच आजार देखील होण्याची शक्यता असते.

या ऋतूमध्ये ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते, ते लोक सहज आजारी पडतात. त्यामुळे ऋतूमध्ये काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आजारी न पडता या ऋतूचा आनंद घेता येईल. प्रत्येक ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत वेगवेगळे बदल करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजेत हे जाणून घ्या.

health care
Health Care News : जाडजूड मांडीवरची चरबी कमी करण्यासाठी 'हे' व्यायाम नक्की करा, पाय दिसतील सुंदर...

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत हे बदल करा

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत काही विशेष बदल केले पाहिजेत.

तज्ज्ञांच्या मते या ऋतूमध्ये त्वचेच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा वेळी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरेल.

कडुनिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. हे त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करते.

पावसाळ्यात डासांचे प्रमाणही वाढले असून, डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. कडुलिंब देखील हे टाळण्यास मदत करू शकते.

कडुलिंबाची पाने डासांना घालवण्यासाठी किंवा मारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

जेव्हा कडुलिंब जळतो तेव्हा एक वास येतो, ज्यामुळे डास दूर होतात. कडुलिंबाची पाने जाळून धुर करावा. त्यानंतर हे डास पळून जातात. विशेषत: सायंकाळी हा उपाय करून पाहावा.

पावसाळ्यात कपडे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच घाला. विशेषत: अंडरगारमेंट्स पूर्णपणे कोरडे केल्याशिवाय घालू नका. यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोका असतो.

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्याला तहान कमी लागते. त्यामुळे लोक कमी प्रमाणात पाणी पितात. पण, या ऋतूतही शरीराला पुरेसे हायड्रेशन आवश्यक असते. त्यामुळे पाणी नक्कीच प्यावे.

पावसाळ्यात कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

तुमच्या आहारात आले आणि तुळशीच्या काढ्याचा समावेश करा. त्यामुळे हंगामी आजार टाळता येतील.

स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी व्यायाम करा.

पावसाळ्यात शिळे व बाहेरचे अन्नही टाळावे.

Shabda kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com