Dipika Chikhila Beauty Tips : सीतेची भुमिका गाजवणाऱ्या दीपिका चिखलीया यांचे ट्रांसफॉर्मेशन पाहिले का? 57 व्या वयातही दिसतात ग्लॅमरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipika Chikhila Beauty Tips  : सीतेची भुमिका गाजवणाऱ्या दीपिका चिखलीया यांचे ट्रांसफॉर्मेशन पाहिले का? 57 व्या वयातही दिसतात ग्लॅमरस

Dipika Chikhila Beauty Tips : सीतेची भुमिका गाजवणाऱ्या दीपिका चिखलीया यांचे ट्रांसफॉर्मेशन पाहिले का? 57 व्या वयातही दिसतात ग्लॅमरस

रामायण या मालिकेने आत्तापर्यंत अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजही ही मालिका टीव्हीवर लागते. सगळे प्रेक्षक ती आवडीने पाहतात. कोरोना काळातही रामायण करोडो प्रेक्षकांनी पाहिले. या मालिकेतील सीता तूम्हाला आज आठवते का?. सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी केली होती. त्या आजही तितक्याच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात.

सीतेच्या रूपात लोकांच्या मनात घर केलेल्या दीपिका चिखलिया यांनी वयाचा अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे. पण आजही त्या सुंदर आणि तितक्याच ग्लॅमरस दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यावर त्या अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांनी नुकतेच केलेल्या ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा: Beauty Tips : नखावर लवकर नेलपॉलिश वाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या

या लेटेस्ट फोटोंमध्ये दीपिका ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहेत. यात त्यांचे कपडे त्यांच्या लुकला अधिकच क्लासी बनवतात. केवळ कपडे नाही तर दीपिका यांच्या मोकळ्या केसांनी आणि मेकअपने देखील एक गोल्डन टच दिला आहे. दीपिका यांचा हा एक कंप्लीट लुक दिसतोय.

हेही वाचा: Diwali Beauty Tips 2022 : दिवाळीत चमकदार त्वचेसाठी घरगुती ब्युटी टिप्स

वयाची 40 शी ओलांडल्यावर महिलांना केसांच्या अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे त्या केसांसोबत वेगळे काही करायला घाबरतात. पण या वयात तीच ती हेअरस्टाइल करून स्वत:चा लुक कंटाळवाणा वाटायला लागतो. त्यामुळे शक्य असेल तेव्हा केसांसाठी नवा हेअरकट करावा असे दीपिका यांचे मत आहे. दीपिका यांचा साध्या हेअरकटऐवजी व्ही-शेपसह लेयर्ड कट आहे.

हेही वाचा: Beauty Tips: त्वचेच्या सर्व समस्यांसाठी हा एकच रामबाण उपाय

दीपिका चिखलिया यांनी त्यांच्या वयानुसार मेकअपमध्येही बदल केला आहे. पूर्वी ती मिनिमल हेवी बेस मेकअप करायच्या. पण, आता त्या स्मूथ फिनिशसह नॅचरल टोन मेकअप करतात. सध्याच्या तरूणींना असं वाटतं की, मेकअप नसतानाही आपली स्कीन ग्लो करावी. त्यामुळे त्या अनेक घरगुती उपाय करतात. पण, काहीही न करता दीपिका यांचा चेहरा मेकअप नसतानाही त्यांचा ग्लो करतो. हे नॅचरल सौंदर्य केवळ एका दिवसात नाही आले तर ते अनेक वर्षापासून घेतलेल्या काळजीचे फळ आहे, असेही दीपिका यांना वाटते.

हेही वाचा: Winter Beauty Tips : Vaseline फक्त स्कीनसाठीच नाही तर केसांसाठीही उपयुक्त

नुकत्याच झालेल्या दिवाळी दीपिका यांनी ट्रॅडीशनल लुक केला होता. त्यांनी कोसा सिल्क साडी नेसली होती. लाइट कलरच्या या साडीने त्यांच्या लुकला एक सॉफ्ट टच दिला होता. कमी मेकअप आणि त्यावर मोठी टिकली लावली होती. केस बांधून त्यांनी गजराही घातला होता.

हेही वाचा: Beauty tips : रोज सकाळी चहा-कॉफीऐवजी ही पेये प्या आणि कायम तरूण दिसा

दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका 'रामायण' मध्ये अभिनेता अरुण गोविल यांनी राम, सुनील लाहिरी यांनी लक्ष्मण तर दीपिकाने सीतेची भूमिका साकारली होती. या मालिकेचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे.