Beauty Tips: त्वचेच्या सर्व समस्यांसाठी हा एकच रामबाण उपाय. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips

Beauty Tips: त्वचेच्या सर्व समस्यांसाठी हा एकच रामबाण उपाय

त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी आपण सगळेच प्रयत्नशील असतो. आजच्या थकावटीच्या जीवनात प्रदूषण आणि कमी झोप यामुळे चेहऱ्यावर परिणाम दिसायला लागतात. आपण अनेकदा काहीना काही उपाय करत असतो. 

असाच एक उपाय म्हणजे बिटाचा रस. बीटामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, आयरन आणि मॅग्नेशियम हे सारे घटक असतात. ही लाल रंगाची भाजी केवळ आपल्या आरोग्यासाठीच चांगली नाही तर ती आपल्या त्वचेसाठीही खूप चांगली असते. बीटरूट त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी तसेच डार्क स्पॉटच्या समस्या दूर करण्यासाठी हे प्रभावी आहे. 

हेही वाचा: Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

त्वचेसाठी बीटरूटचे फायदे - बीटरूट त्वचेसाठी फायदे: 

1. मुरुम, तेलकट त्वचा: मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी बीटरुट आपल्यासाठी एक वरदान आहे. काकडीचा रस आणि बीटचा रस समान प्रमाणात मिसळा, याचे ज्यूस आपल्या त्वचेसाठी चांगले आहे. हे ज्यूस रोज प्यायल्याने मुरुमांपासून सुटका होते.

हेही वाचा: Health Tips: 10 पदार्थाचा आहारात करा समावेश मेंदू होईल 'सुपर कॉम्प्युटर'

2. गुलाबी आणि सुंदर ओठांसाठी: 

बीटरूटचा वापर केल्याने आपले ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होऊ शकतात. बीटरूटमध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत. हे ओठांचा रंग बदलण्यास मदत करतात आणि त्यांना हायड्रेट देखील ठेवतात. हे ओठांना नरीश करण्यासाठी कार्य करते. फ्रीज मध्ये बीटाचा तुकडा ठेवून तो ओठांवर लावा.

हेही वाचा: Diwali Recipe: बिना पाकाचे बेसन लाडु कसे तयार करायचे ?

3. ड्राय स्किनला हायड्रेट करण्यासाठी:

बीटरूट कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी एक उत्तम हायड्रेटर आहे आणि यामुळे त्वचेवर झालेले कोरडे पॅच निघण्यास मदत करतो. बीटरूट त्वचा मऊ आणि तरुण बनवतो. हे त्वचेच्या संबंधित जवळजवळ सर्व समस्यांचे निराकरण करण्यासारखे असू शकते.

हेही वाचा: Vastu Tips For Yoga : योग अन् प्राणायाम करून फायदा होत नाहीये? ही दिशा ठरेल कारक

4. डार्क सर्कल्स आणि डार्क स्पॉट दूर करण्यासाठी डार्क सर्कल्स आणि डार्क स्पॉट दूर करण्यासाठी बीटाचा रस सर्वात वेगवान मार्ग आहे. रात्री झोपण्याआधी बिटाचा रस डोळ्याखाली आणि चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा नैसर्गिक रंग परत येतो.

टॅग्स :lifestyleBeauty Tips