

दीप्ती देवी / प्रियांका शर्मा
मैत्री हे एक असं नातं आहे, ज्यात कोणताही दिखावा नसावा. त्यात असावं ते सुंदर आणि नितळ प्रेम, जिथं शब्दांच्या पलीकडे भावना आणि समजुती असतात. अभिनेत्री दीप्ती देवी आणि प्रियांका शर्मा यांचं नातं याच विश्वासावर आधारित आहे. शाळेपासूनच सुरू झालेल्या त्यांच्या मैत्रीला आता अनेक वर्षांचा कालावधी उलटला आहे आणि हे नातं अधिक घट्ट आणि मजबूत झालं आहे.
त्यांच्या मैत्रीचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात कुठेही कोणताही प्रपंच, भेटींचे नियम, किंवा संवादाची शिस्त नाही. त्यांच्या मैत्रीमध्ये विश्वास, प्रोत्साहन आणि समर्पण हे भाव असतात, जे त्यांच्या नात्याला अजूनच विशेष बनवतात.