आलिया भटला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा तिने तिच्या लग्नातली साडी नेसली म्हणून नेटकऱ्यांनी केवढं ट्रोल केलं होतं; पण तेव्हा तिनं आत्मविश्वासानं सांगितलं, की ‘स्टायलिंग करताना कपडे कलात्मकतेनं पुन्हा घातले, तर त्यात बिघडलं कुठे?’.काजोलच्याही एका मुलाखतीत मी ऐकलं होतं, सेल असेल तर ती आवर्जून शॉपिंग करते आणि वर्षानुवर्षं तिला आवडणाऱ्या गोष्टी पुनःपुन्हा वापरायलाही तिला आवडतात. आजकाल मात्र बऱ्याच जणींना वाटतं, ‘अमुकतमुक कार्यक्रमात ही साडी नेसली होती.माझ्या सोशल मीडियावर या ड्रेसवरचे फोटो टाकले आहेत, तर आता ते परत कसे रिपीट करायचं?’ खरंतर अगदी असा विचार माझाही व्हायचा. मलाही दिवसातून दोन ते तीन वेळा कपडे बदलायला आवडतात. वेगवेगळे कपडे घालायला आवडतात, याचा अर्थ घातलेले कपडे परत रिपीट करायचे नाही असं होतच नाही..बऱ्याचदा बजेटमुळे म्हणा किंवा पर्यावरणाची जाणीव म्हणून म्हणा आपण आउटफिट रिपीट करायला हवेत. यामुळे स्टाइल कमी होते का? तर अजिबात असं होत नाही. एकच कुर्ता, साडी किंवा लेहंगा वेगवेगळ्या पद्धतीनं वापरून आपण दरवेळी नवा लूक तयार करू शकतो.‘आउटफिट रिपिटिंग’ ही एक कला आहे आणि ती आत्मविश्वासाने आणि स्टाइलने केल्यास ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत ठरते. यासाठी खरोखर सर्जनशीलता महत्त्वाची ठरते. वेगवेगळे कॉम्बिनेशन करण्यासाठी स्टायलिंगचा एक वेगळा अंदाज असायला हवा. तरच आपण या कलात्मकतेचा आनंद घेऊ शकतो..महागाचे घेतलेले कपडे कपाटात तसंच ठेवून देणं म्हणजे खरंतर गुन्हा किंवा जुन्या साड्या पुन्हा न वापरण्याचं दडपण मलातरी खूप वेळेला येतं. खरंतर यू-ट्यूबचे व्हिडिओ बनवताना आणि पॉडकास्ट करताना असंख्य साड्या लागतात आणि मी त्या चक्क रिपीट करते. खरंतर त्या प्लॅटफॉर्मवर मलाही ते वावगं वाटत नाही, कारण तिकडे कपड्यांपेक्षा कॉन्टॅक्टला जास्त महत्त्व आहे.दागिने हेअर स्टाईल किंवा ॲक्सेसरीज यामध्ये विविधता आणली तर तीच साडी वेगळी दिसते असं माझ्या लक्षात आलं. चित्रपटाचं प्रमोशन किंवा मुलाखती यासाठी मात्र मला वेगवेगळ्या लूकमध्ये जायला आवडतं आणि त्यासाठी खास स्टायलिस्ट किंवा फॅशन डिझायनर असतात. तिथेही कपडे वापरल्यानंतर त्यांना परत देऊन टाकणं हे खूप फायद्याचं आणि योग्य वाटतं..ॲवॉर्ड फंक्शनसाठी वेगळी थीम असलेले कपडे किंवा साड्या आऊटफिट्स हेसुद्धा स्टायलिस्टकडून स्टायलिंग करायला आवडतात; पण तिथंही जर का माझ्याकडे काही उत्तम असेल, तर त्याची सांगड घालायलाही आवडते. असंच कलात्मक पद्धतीनं आपण आऊटफिट रिपीट कसे करू शकतो याबद्दल काही टिप्स देते आहे..हे करून पाहाएका आउटफिटला स्टाइल करताना दर वेळी वेगळी स्टोरी तयार करा. उदाहरणार्थ, एकदा ट्रायबल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, दुसऱ्यांदा पर्ल किंवा मोठी बिंदी, तिसऱ्यांदा हेडबँड किंवा स्कार्फ. ॲक्सेसरीज बदलल्या की तेच कपडेही ‘नवे’ वाटतात.हे अत्यंत कमी लक्षात घेतले जाते; पण कपडे रिपिट करताना हेअर स्टाइल (बन, पोनी, वेव्ही हेअर) आणि शूज बदला. साडीवर स्नीकर्स किंवा कुर्त्यावर बूट घालून quirky स्टाइल तयार होते.कुर्त्याचा वापर करून जॅकेटसारखा स्टाइल करा (विशेषतः ए-लाइन किंवा फ्रंट कट कुर्ते). त्याला इनरवर टाकून fusion shrug लूक मिळतो. किंवा बेल्ट लावून ड्रेससारखा वापरा – कॅज्युअल पार्टीसाठी परफेक्ट!वेगवेगळे टी-शर्ट हे ब्लाउजप्रमाणे घालू शकतो किंवा काही शर्ट, स्कर्टवर वापरू शकतो किंवा श्रग म्हणूनही वापरता येतात. जुने झालेले टी-शर्ट वेगवेगळ्या जॅकेटच्या आतमध्ये कळूनही येत नाहीत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.