Diwali 2023 : दिवाळीनंतर मातीच्या दिव्यांचे काय करावे? ज्योतिष शास्त्रातील हे उपाय करा, प्रगती होईल

दिवाळीनंतर त्या दिव्यांची अवहेलना केली जाते
Diwali 2023
Diwali 2023 esakal

Diwali 2023 :

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेली दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी थाटामाटात साजरी झाली. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. ५ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा प्रत्येक दिवस खूप खास असतो.

अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः रात्री पृथ्वीवर येते आणि घरोघरी फिरते. तसेच, ती लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देते. यामुळे मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. दिवे, रांगोळी घर सजवतात. पण, दिवाळीनंतर त्या दिव्यांची अवहेलना केली जाते. काही लोक ते फेकून देतात. तर काही पुढील दिवाळीसाठी वापरतात. त्यामुळे या दिव्यांचं काय करायचे हे पाहुयात.

Diwali 2023
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगगडावर दीपपूजन; दिवे बंद केल्यानंतर उजळले देवीचे तेजोमय रूप!

दिवे लपवून ठेवावेत

दिवाळीच्या वेळी बहुतेक लोक दिवे घरीच ठेवतात. पण हे दिवे कोणालाही दिसणार नाहीत असे ठेवावेत. कारण हे वापरलेले दिवे पाहून शुभ कामाला निघणे अशूभ असते. यासाठी हे दिवे घरात लपवून ठेवणे चांगले. असे केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

दिव्याचे दान करा

दिवाळीत लावलेल्या दिव्यांना दान करणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की याद्वारे एखाद्या व्यक्तीला शुभ लाऊ होळू शकतात आणि त्याच्या जीवनात नेहमी आनंद राहतो आणि माता लक्ष्मी देखील तेथे वास करते. याशिवाय सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

Diwali 2023
Diwali Shopping In Mumbai : दिवाळीची खरेदी तर मुंबईतच करायची: दिवे,लाईट्स,सजावटीच्या वस्तूंची असंख्य व्हरायटी
मातीचे दिवे आपल्या घरातील अनेक नकारात्मक गोष्टी घालवतात
मातीचे दिवे आपल्या घरातील अनेक नकारात्मक गोष्टी घालवतातesakal

घरामध्ये 5 दिवे ठेवा

ज्योतिषांच्या मते, दिवाळीनंतर दिवे लावल्याने घरातून नकारात्मक शक्ती नष्ट होतात. अशा वेळी दिवाळीनंतर लावलेल्या दिव्यांपैकी ५ दिवे घरात ठेवा आणि उरलेले दिवे वाटून टाका. हे उपाय केल्याने घरात सुख,शांती आणि समृद्धी राहते आणि माणसाच्या जीवनात येणारी सर्व दु:खं दूर होतात.

नदीत सोडून द्या

दिवाळीनंतर नदीत किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही प्रज्वलित केलेले दिवे सोडू शकता. अनेक लोक घरात दिवे ठेवतात, जे चुकीचे आहे. खरे तर जुने दिवे घरात नकारात्मकता वाढवतात. यासोबतच घरातून सुख-शांती हिरावून घेतली जाऊ शकते. यामुळेच दिवाळीनंतर नदीत सोडून द्यावेत.

Diwali 2023
Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येने मोडला स्वतःचा विश्वविक्रम! दिवाळीच्या पूर्वसंध्येला 22 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com