दिवाळीपूर्वी सोन्याचे दागिने काळपट पडले? घरच्या घरी अशी वाढवा चमक; 'या' चुका टाळा

दिवाळीपूर्वी सोन्याचे दागिने काळपट किंवा निस्तेज दिसत आहेत? घरच्या घरी स्वच्छ करण्याचे सोपे उपाय आणि दागिने खराब होऊ नयेत यासाठी टाळायच्या चुका जाणून घ्या.
Diwali Gold Jewellery Cleaning Tips

Diwali Gold Jewellery Cleaning Tips

sakal

Updated on: 

दिवाळी म्हटलं की घराची स्वच्छता, फराळाची तयारी आणि नवीन कपड्यांसोबत दागिन्यांचीही लगबग सुरू होते. लक्ष्मीपूजन असो किंवा दिवाळी पाडवा, सणासुदीच्या दिवशी सोन्याचे दागिने घालण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. मात्र, वर्षभर वापर न केलेले किंवा सतत अंगावर असलेले सोन्याचे दागिने अनेकदा निस्तेज दिसू लागतात. घाम, धूळ, तेल आणि मेकअपच्या अवशेषांमुळे दागिन्यांवर मळ साचतो आणि त्यांची नैसर्गिक चमक कमी होते.

Loading content, please wait...