

वर्षभरात अनेक असे सण उत्सव आपण साजरे करतो ज्यात देवीचा जागर असतो. महिला श्रावणी मंगळवार,शुक्रवार, मार्गशिर्ष महिन्यातील गुरूवारी देवीची उपासना करतात. देवीची पूजा करतात. या दिवसांची वेगळी कथा आहे ती वाचतात. पण, दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनाची कथा आहे तुम्हाला माहितीये का?
दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवसाची एक कथाही आहे. ती कोणती हे जाणून घेऊयात.
दिपवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यात येते. यासंबंधीची अशी कथा आहे की, पूर्वकाळी बलिराजा मोठा वैभवशाली होऊन, त्याने आपल्या संपत्तीच्या व पराक्रमाच्या योगाने देवादिकांसही कारागृहात कोंडून ठेविले. प्रत्यक्ष लक्ष्मीसही बळीच्या बंदिशाळेत दिवस कंठावे लागले. त्या वेळी श्रीविष्णूने वामनाचे रूप धारण करून त्रिपाद भूमिदान मागण्याच्या मिषाने सर्व विश्वावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले.
सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका झाली. बली पाताळात दडपला गेला. लक्ष्मीची याप्रमाणे असुरांच्या हातांतून मुक्तता झाल्या- बद्दल सर्वांस आनंद झाला. व तिचे वास्तव्य प्रत्येकाच्या घरात कायमचे असावे एतदर्थ तिची भक्तिपूर्वक पूजा करण्याचा प्रघात या दिवसापासून प्रचारात आला. अमावास्येस लक्ष्मीपूजन करण्यात येते.
(संबंधित कथा लेखक ऋग्वेदी यांच्या आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या पुस्तकातून घेण्यात आली आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.