Diwali Recipes 2023 : गोड लाडू, करंजीसोबत ताटाची शोभा वाढवेल मठरी, रेसिपी आहे एकदम सोप्पी

मठरी जास्त दिवस टिकते हाच तिचा प्लस पॉईंट आहे
Diwali Recipes 2023
Diwali Recipes 2023 esakal

Diwali Recipes 2023 : सकाळचा चहा असो वा संध्याकाळची कॉफी, त्यासोबत काहीतरी खावेसे वाटते. त्यामुळे अनेकांना चहासोबत स्नॅक्स खायला आवडते. आता दिवाळी येणार आहे त्यामुळे दिवाळीतील फराळ चहाची गोडी अधिकच वाढवतो. 

तुम्हाला गोड पदार्थासोबत काहीतरी नमकिन,चटपटीत हवं असेल तर मसाला मठरी हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. अचूक रेसिपी माहिती नसल्याने मठरी बनवण्याची मेहनत व्यर्थ जाऊ शकते.मठरी एकदा बनविला की अनेक दिवस टिकती व तुम्ही रोज नाश्ता करू शकाल. सोप्प्या पद्धतीने मठरी कशी बनवायची हे पाहुयात.

Diwali Recipes 2023
Diwali Recipes : दिवाळीनिमित्त पारंपारिक पद्धतीने बनवा रंगीत कानवले

साहित्य : 2 कप गव्हाचे पीठ , ¼ कप बेसन, 6 चमचे बारीक रवा 1 ते 1¼ चमचे मीठ. ओवा, कसुरी मेथी,कलोंजी, काळी मिरी पूड प्रत्येकी 1 चमचा

कृती

  • गव्हाचे पीठ आणि सर्व मसाले एकत्र करा. त्यात गरम तूप किंवा तेल घाला. तेलाचा अंदाज घेतच पिठ मळून घ्या. आवश्यक असेल तर पाणी घालून घट्टसर पिठ तयार करा.  हे १० मिनिटे झाकून ठेवा.

  • या पिठापासून लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करा. त्या पिठापासून हाताने दाबूनच लहान पुरी तयार करा. असे सगळ्याच गोळ्यांच्या मठरी तयार करून घ्या.

Diwali Recipes 2023
Diwali 2022 : फराळात महिलांच्या मदतीला धावून येणारा फराळवाला : Diwali Recipes : Maharashtra Faralwala
  • मठरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा. तेल उकळले की त्यात मठरी टाकून तळायला ठेवा. मंद आचेवर सर्व मठरी तळून घ्या.

  • तेल योग्य पद्धतीने तापलं आहे की नाही हे कसं ओळखाल? 

  • तेल मध्यम गरम असले पाहिजे आणि गरम नसावे. तपासण्यासाठी गरम तेलात पिठाचा एक छोटा तुकडा टाका. जर मठरी तेलात हळू हळू वर येत असेल तर, तेल पुरेसे गरम आहे असे समजावे.

  • मठरीमध्ये फोर्कच्या मदतीने थोडे-थोडे छेद करा. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये डीप फ्राय करून घ्या. पीस गोल्डन ब्राऊन रंगाचे होत नाहीत तो तोपर्यंत गॅस चालूच राहू द्या.

  • त्यानंतर पिस काढून बटर पेपरवर थंड होण्यासाठी ठेवा. आता एका हवेशीर डब्यात ठेवून द्या. (Diwali Recipe)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com