Diwali Shopping 2022 : दिवाळीत बजेट न बिघडू देता करा मनसोक्त शॉपिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Shopping 2022

Diwali Shopping 2022 : दिवाळीत बजेट न बिघडू देता करा मनसोक्त शॉपिंग

Diwali Shopping Without Money Loss : वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला सर्वांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. बाजारपेठांमध्ये, ऑनलाइन साइट्सवर ऑफर्सचं पिक आलेलं असतं. अशावेळी ऑफर्सच्या नादात आपण शॉपिंग तर करतो, पण मग नंतर समजतं दिवाळीत दिवाळं निघालं.

हेही वाचा: Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

म्हणूनच या काळात केलेल्या खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. स्मार्ट पद्धतीने आगाऊ नियोजन करून खर्च असेल तर सणही साजरे करता येतील आणि खर्चही बजेटमध्ये होईल. यासाठी आम्ही काही टीप्स देणार आहोत.

हेही वाचा: Tax On Diwali Gift : दिवाळीला तुम्हालाही मिळतात गिफ्ट? तर, भरावा लागेल टॅक्स

ट्राय करा या टिप्स

  • सर्वप्रथम तुमच्या सणासुदीच्या खर्चाचे बजेट सेट करा. बहुतेक लोकांना दिवाळीत बोनस मिळतो. जर तो हुशारीने खर्च केला तर आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यातही मदत होऊ शकते.

  • सणासुदीच्या खर्चाचे बजेट बनवताना जास्तीत जास्त खर्चाची मर्यादा निश्चित करा.

हेही वाचा: Diwali 2022 : दिवाळीचं वैभव अनुभवायचं; भारतातील 'ही' ठिकाणं आहेत Super

  • आवश्यक गोष्टींची यादी तयार करा. म्हणजेच, सर्वात महत्वाचे काम प्रथम ठेवा. जेणेकरून पैसे कमी असले तरी महत्त्वाच्या गोष्टी चुकणार नाहीत.

  • ई-कॉमर्स कंपन्या एकापेक्षा जास्त डील ऑफर करत आहेत. ग्राहकांना केवळ जीवनावश्यक वस्तू स्वस्तात विकत घेण्यासाठी सवलत फायदेशीर ठरते. पण या सवलतीमुळे कधी कधी अनावश्यक खर्चही होतो.

  • क्रेडिट कार्ड ऐवजी डाउन पेमेंटवर मोफत अॅक्सेसरीजऐवजी शून्य टक्के ईएमआय सारख्या पर्यायाचा पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते.

हेही वाचा: Diwali 2022 : दिवाळीत 'या' गोष्टींकडे करू नका दूर्लक्ष, नाहीतर आनंदात पडेल विरजण

  • खरेदी करण्यापूर्वी, सर्व वेबसाइटवरील किमतींची तुलना केल्याचे सुनिश्चित करा. जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीची तुलना करणे चांगले.

  • काही वस्तूंसाठी तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाइटवर चांगल्या डिल मिळू शकतात, तर काहींसाठी तुम्हाला स्थानिक दुकानांमधून प्रचंड सूट मिळू शकते. अशा शॉपिंगसाठी थोडा रिसर्च महत्त्वाचा आहे.