Dmart Discount Offers : डीमार्टमध्ये खरेदी करताना ऑफर्सचा फायदा घ्यायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घ्याल.. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी.पहिली गोष्ट म्हणजे बिल तपासा, सामान मोजाखरेदी झाल्यावर काऊंटरवरून सामान घेऊन घाईघाईत निघू नका. बिल नीट तपासा आणि सामान मोजून बघा. अनेकदा गर्दीमुळे किंवा घाईमुळे चुकीच्या वस्तू किंवा कमी वस्तू बॅगेत येऊ शकतात. घरी आल्यावर लक्षात येतं की आपण घेतलेली चॉकलेट किंवा साबण गायब आहे.. त्यामुळे काऊंटरवरच सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करा..Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर.दुसरी गोष्ट म्हणजे ऑफर्स नीट समजून घ्याडीमार्टमध्ये अनेकदा ‘एकावर एक फ्री’ किंवा ‘20% सूट’ अशा आकर्षक ऑफर्स असतात. पण त्या ऑफर्सच्या अटी व शर्ती नीट वाचा. काही ऑफर्स विशिष्ट ब्रँडवर किंवा ठराविक रकमेच्या खरेदीवरच लागू असतात. उदाहरणार्थ तुम्ही 500 रुपयांचं साहित्य घेतलं, पण ऑफर 1000 रुपयांच्या खरेदीवर आहे, तर तुम्हाला ती मिळणार नाही. त्यामुळे ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर आधी नियम समजून घ्या..Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!.तिसरी गोष्ट म्हणजे खरेदीची यादी तयार कराडीमार्टमध्ये गेल्यावर स्वस्त वस्तू पाहून अनावश्यक खरेदी होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरून निघण्यापूर्वी गरजेच्या वस्तूंची यादी बनवा आणि त्याच गोष्टी खरेदी करा. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची डीमार्टमधली खरेदी होईल मजेदार आणि फायदेशीर! पुढच्या वेळी या टिप्स नक्की वापरा.FAQsWhy should I check my bill before leaving DMart?डीमार्टमधून निघण्यापूर्वी बिल का तपासावे?बिल तपासल्याने तुम्हाला सामान कमी किंवा चुकीचे मिळाले आहे का हे कळते, ज्यामुळे नुकसान टाळता येते.How can I make the most of DMart offers?डीमार्टच्या ऑफर्सचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा?ऑफर्सच्या अटी व शर्ती नीट वाचा आणि त्या पूर्ण होतात का ते तपासा, मगच खरेदी करा.Is it necessary to make a shopping list for DMart?डीमार्टसाठी खरेदी यादी बनवणे गरजेचे आहे का?होय, यादीमुळे अनावश्यक खरेदी टाळता येते आणि वेळ व पैशांची बचत होते.What happens if I don’t check my items at the counter?काऊंटरवर सामान तपासले नाही तर काय होऊ शकते?काही वस्तू कमी किंवा चुकीच्या मिळाल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.Can I trust all DMart offers blindly?डीमार्टच्या सर्व ऑफर्सवर डोळे झाकून विश्वास ठेवावा का?नाही, प्रत्येक ऑफरच्या अटी तपासा, कारण काही ऑफर्स विशिष्ट खरेदीवरच लागू असतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.