

dmart november special offers up to 80 percent off on grocery and other daily essentials
esakal
DMart Discount Offers : दिवाळीनंतर हा नवा महिना सुरू होताच, देशभरातील आवडत्या सुपरमार्केट चेन डीमार्टने ग्राहकांना आनंदाची चांगली बातमी दिली आहे. नोव्हेंबर फेस्टिव्हल बूम स्पेशल सेलमध्ये ७०-८०% पर्यंत भन्नाट सूट मिळत आहे..दैनिक गरजेच्या, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्सवर असा बंपर डिस्काउंट मिळणे म्हणजे खरच खिशाला दिलासा देणारा आहे. डीमार्ट रेडी अॅपद्वारे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी हे ऑफर्स अजूनही सोपे आणि फास्ट झाले आहेत. आता स्टोअरमध्ये जाऊन गर्दीचा सामना करण्याची गरज नाही; एका क्लिकवर घरबसल्या सर्व काही स्वस्तात मिळवता येईल