

Do Parents Secretly Favour One Child? What Research Says About Favourite Children
sakal
घरात दोन भावंडं असतील तर एक प्रश्न कधी ना कधी नक्कीच मनात येतो; आई-बाबांचं लाडकं मूल नेमकं कोणतं? कदाचित घरात हे उघडपणे कधी बोललं जात नसेल, पण एखाद्याला जास्त कौतुक, दुसऱ्याला जास्त ओरडा किंवा एखाद्याच्या चुका सतत माफ होणं. या छोट्या-छोट्या गोष्टी मुलांच्या मनात मात्र कायमच्या घर करून राहू शकतात. विशेष म्हणजे, आई-वडील मुलांमध्ये भेदभाव करत नाहीत असं मानत असले, तरी मुलांना तसं वाटतंय का, हे अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. संशोधनातून पालकांच्या ‘फेव्हरेट चाइल्ड’बाबत काही रंजक आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.