Winter Warmness : कडाक्याच्या थंडीत सिगरेटचा झुरका, एक पेग देतो का ऊब? डॉक्टर म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Warmness

Winter Warmness : कडाक्याच्या थंडीत सिगरेटचा झुरका, एक पेग देतो का ऊब? डॉक्टर म्हणतात...

Does Smoking and Drinking Give Warmness In Winter : सगळीकडे थंडीची लाट आली आहे. तापमानाचा पार फार खाली गेला आहे. बऱ्याच ठिकाणी तर धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. अशात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधलं 'ऐसे सर्दी मे थंडसे लडकी के सामने दम तोडने से तो अच्छा है शराब पिना... जिंदा रेहना है तो तुम भी पिओ...' वाक्य तुम्हालाही आठवलंच असेल. पण हे खरं आहे की, फक्त बहाणा? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर.

काय सांगतात तज्ज्ञ

एका रिपोर्टनुसार अल्कोहोलला सर्दीचं पेय समजून पिलं जातं. यामुळे शरीरात सेंसेशन वाढतं आणि गर्मी येते. परंतु प्रत्यक्षात यामुळे शरीराचं तापमान कमी होतं. आणि यामुळे हायपोथर्मिया चा धोका वाढतो.

हेही वाचा: Winter Season : इगतपुरी तालुक्यात थंडीची लाट; ढगाळ वातावरणासह पसरली धुक्याची चादर!

सिगरेट किंवा दारू सोडून उपाय शोधावा

थंडीच्या ऋतूमध्ये हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. यासाठी दारू, सिगारेटचा आधार किंवा बहाणा निवडू नका असं डॉक्टर सांगतात. शिवाय सुर्योदयापुर्वी मॉर्निंग वॉक घेऊ नये. पण थंडीच्या दिवसात जेवढे अ‍ॅक्टिव्ह रहाल तेवढी ऊर्जा शरीरात तयार होत राहील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :smokingWinterDrinks news