Relationship Tips : घरात पार्टनरसोबत करा या गोष्टी... दोघांनाही एकदम भारी वाटेल...

एकमेकांसोबतची मस्ती आणि खोडकरपणा यामुळे नातं रोमँटिक होतं. अर्थात....
Relationship Tips
Relationship Tipsesakal

Relationship Tips : नात्यात उत्साह असणं खूप गरजेचं आहे. एकमेकांसोबतची मस्ती आणि खोडकरपणा यामुळे नातं रोमँटिक होतं. अर्थात फक्त गिफ्ट देणं, बाहेर फिरायला जाणं, सरप्राइज देणं याने हे होतंच पण त्याच बरोबर अशाही काही गोष्टी असतात ज्या तुम्ही घरबसल्या करु शकतात. खरंतर, पुन्हा पुन्हा तेच करुन करुन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे काहीतरी नवीन करुन बघायला हवं म्हणजे तुमच्यातलं बॉंडिंग वाढेल आणि दोघांनाही एकदम भारी वाटेल.

कपल डांस (Couple Dance)

Relationship Tips
Relationship Tipsesakal

रोमँटिक गाण्याने नात्यात उत्साह वाढतो. चित्रपटांमध्ये अशा गाण्यांवर आपण अनेकदा कपल्स नाचतानाही बघितलं असेल. पण फक्त काल्पनिक आयुष्यात असं घडतं असं कशाला तुम्हीही आपल्या पार्टनर सोबत छान डान्स करु शकतात.

Relationship Tips
Relationship Tips :  बेस्ट फ्रेंडवरच तूमचा जीव जडलाय?; ‘प्यार का इजहार’ असा करा ती ‘हो’च म्हणेल!

आता यात फक्त मला डांस येत नाही, मी कधी डांस केला नाही किंवा मला जज करतील याचा विचार सोडून आपल्या पार्टनरसोबत त्याचा हात हातात घेत आणि नजरेत नजर देत छान डांस करा. अगदीच दररोज नाही पण कधीतरी असे प्लॅन करता येतील.

Relationship Tips
Relationship Tips : पार्टनर प्रेम नाही तर तूमचा वापर करतोय, कसं ओळखाल?

पार्टनरसोबत गेम्स खेळा (Games with Partner)

Relationship Tips
Relationship Tipsesakal

आपल्या पार्टनरसोबत तुम्ही गेम्स खेळू शकतात. अगदी घरी बसूनही हे गेम्स खेळता येतील, जसे की कॅरेम, चेस, किंवा लुडो किंवा इतर काही मजेशीर खेळ. यात मजा म्हणून जिंकण्या आणि हरण्यावर काही अटी लावा. फक्त यात आपल्या पार्टनरचं मन जपा... त्याच्या आवडीची काळजी घ्या.

Relationship Tips
Relationship Tips :  बेस्ट फ्रेंडवरच तूमचा जीव जडलाय?; ‘प्यार का इजहार’ असा करा ती ‘हो’च म्हणेल!

याशिवाय तुम्ही दोघे अंताक्षरीही खेळू शकता. या दरम्यान काही अट ठेवा की फक्त रोमँटिक गाणीच गायली पाहिजेत. आपल्या पार्टनरला न आवडणारा कोणताही खेळ खेळू नका. या दरम्यान एकमेकांच्या आवडीचीही काळजी घ्या.

Relationship Tips
Relationship Tips : नवरा-बायकोचं नातं ताजंतवानं ठेवण्यासाठी काय कराल ?

पेंटिंग आणि फोटोग्राफी ट्राय करा (Painting and Photography with Partner)

पेंटिंग आणि फोटोग्राफी दोघीही खूप क्रिएटिव्ह गोष्टी आहेत अशा गोष्टी सोबत केल्याने तुम्हाला एकमेकांच्या क्रिएटिव्ह स्किल्स कळतील आणि मजाही येईल. जर तुम्हाला पेंटिंग करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही एकमेकांचे फोटो काढू शकतात किंवा फ्रंट कॅमेरा वापरुन दोघांचे फोटो काढू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com