esakal | हाताची त्वचा तरुण ठेवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

बोलून बातमी शोधा

skin care
हाताची त्वचा तरुण ठेवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: हातांच्या त्वचेचा कोरडेपणा आणि रिंकल्स तुम्हाला कमी वयातच होऊ लागल्यात तर खूप खराब वाटू लागते. यावरून तुमचे कमी वय असतानाही जास्त वाटू लागते. याकडे वेळीच लक्ष नाही दिलं तर त्याचा मोठा तोटा होऊ शकतो. याचं कारण आपण वारंवार हात धुण्यासाठी साबणाचा वापर करतो त्याचा त्वचेवर दुष्परिणाम पडतो. तसेच सध्या कोरोनामुळे सॅनिटाइजरचा वापरही वाढला आहे.

आपले हात वारंवार धूळीत, मातीत तसेच घामात असल्यास त्याचाही वाईट परिणाम शरीरावर होतो. जर तुमच्या शरीराची त्वचेची योग्य काळजी घेतली तर तुम्ही अजून तरुण दिसू लागाल.

या चूका तुमच्या हाताच्या त्वचेसाठी धोकादायक ठरतात-

- जर हातांना योग्य पद्धतीने हायड्रेटेड नाही केले तर

- त्वचेवरील डेड त्वचा नाही काढली तर.

- वारंवार त्वचेवर साबणाचा उपयोग केला तर.

- स्मोकिंग करणाऱ्यांचेही हात लवकर खराब होऊ शकतात.

घरगुती उपायांनी बनवा त्वचेला तरुण-

१. पहिली पद्धत-

- ताजे एलोवेरा जेल घ्या.

- त्यानंतर ते तुमच्या त्वचेवर स्क्रब करा. जर तुमच्याकडे ताजा जेल उपलब्ध नसेल तर तुम्ही ते बाजारातून घेऊ शकता. ताजे जेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

-दोन्ही हातांवर ते जेल व्यवस्थित लावून घ्या.

२. दुसरी पद्धत-

- सगळ्यात पहिल्यांदा दोन चमचे नारळ तेल घ्या. जर ते कोल्ड नारळ तेल असेल तर ते बरंच फायदेशीर ठरते.

- यात तुम्हाला दोन व्हिटॅमिन ईच्या गोळ्या टाकाव्या लागणार आहेत.

- त्यानंतर ते त्वचेवर व्यवस्थित लावून घ्या.

- हे तेल बोटांच्या मधोमध, नखांखाली व्यवस्थित लावून घ्यावे.

याचा बराच उपयोग तुमची हाताची त्वचा योग्य ठेवण्यास होऊ शकतो.