Sleep: तुम्हालाही गुडघे वर करुन झोपायची सवय आहे? आताच बदला नाहीतर...

अनेकदा आपण झोपेत गुडघे वर करुन झोपतो मात्र ही स्थिती जास्त वेळ चांगली नाही
sleep
sleepsakal

प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या कम्फर्ट प्रमाणे हव्या त्या पोझिशनमध्ये झोपणे पसंत करतात. कधी कधी आपण झोपेत नकळत गुडघे वर करुन झोपतो पण गुडघे वर करुन झोपल्याने शारीरीक त्रास होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

गुडघे वर करुन झोपणे चांगले?

गुडघे वर करुन थोडा वेळ पडून राहणे अनेकांना चांगलं वाटतं किंवा अनेकदा आपण झोपेत गुडघे वर करुन झोपतो मात्र ही स्थिती जास्त वेळ राहिली तर गुडघ्याखालील पायांना रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो त्यामुळे पायांना मुंग्या येतात आणि पाय दुखतात. यामुळे गुडघ्यांचे दुखणे वाढते.

sleep
Knee Pain : तुमचे गुडघे दुखतात का? संशोधकांनी सांगितला उपाय!

झोप ही माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे झोपताना नीट झोपणे गरजेचे आहे. आजाराला आमंत्रण द्यायचे नसेल तर आहार, व्यायाम आणि झोप हे तीन्ही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपल्या शरिरातील रक्त वाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत काम करत असतात. मात्र रक्त प्रवाह होत असताना थोडा जरी अडथळा निर्माण झाला तरी याचा परिणाम थेट अवयवांवर होत असतो. त्यामुळे झोपताना रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे झोपू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com