माजी आमदारांमध्ये 'यांना' मिळतेय सर्वाधिक पेन्शन ! कोण आहेत टॉपवर? | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी आमदारांमध्ये 'यांना' मिळतेय सर्वाधिक पेन्शन ! कोण आहेत टॉपवर?
माजी आमदारांमध्ये 'यांना' मिळतेय सर्वाधिक पेन्शन ! कोण आहेत टॉपवर?

माजी आमदारांमध्ये 'यांना' मिळतेय सर्वाधिक पेन्शन! कोण आहेत टॉपवर?

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पाच वर्षांसाठी आमदार (MLA) राहिलेल्या माजी आमदारास दरमहा 50 हजारांची पेन्शन (Pension) राज्य सरकारकडून दिली जाते. पाच वर्षांनंतर आमदारकीच्या प्रत्येक वर्षासाठी दोन हजारांची वाढ होते. त्यानुसार जिल्ह्यातील 24 माजी आमदारांना दरमहा 14 लाख 98 हजारांची पेन्शन मिळते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (Vijaysinh Mohite-Patil) हे जिल्ह्यातील अन्य माजी आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक एक लाख दोन हजारांची पेन्शन घेतात.

हेही वाचा: सोशल मीडियावर चुकीचे काही टाकू नका! सोलापुरातील युवक जेरबंद

राज्यातील 668 माजी आमदारांना दरमहा राज्याच्या तिजोरीतून पेन्शन दिली जाते. लोकहितासाठी आमदार म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना उदरनिर्वाह करताना अडचणींचा सामना करावा लागू नये, या हेतूने ही पेन्शन दिली जाते. माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री राहिलेले लोकप्रतिनिधी राज्यातून आमदार झाले असतील, त्यांना केंद्र व राज्य सरकारकडूनही पेन्शन मिळते. 28 ऑक्‍टोबरला अद्ययावत केलेली माजी आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यात माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव समाविष्ट नाही. विधान भवनातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जे माजी आमदार पेन्शन घेत नाहीत, त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

माजी आमदार गणपराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यात सर्वाधिक पेन्शन नंदुरबारचे स्वरूपसिंग नाईक (एक लाख 16 हजार रुपये) यांना मिळते. त्यानंतर नाशिकचे जीवा गावित व नगरचे मधुकरराव पिचड (प्रत्येकी एक लाख 10 हजार रुपये), मुंबईचे माजी आमदार रोहिदास पाटील यांनाही दरमहा एक लाख आठ हजारांची पेन्शन दिली जाते. अनंतराव थोपटे, विजयसिंह मोहिते-पाटील, प्रकाश मेहता, एकनाथ खडसे यांनाही दरमहा एक लाखांपर्यंत पेन्शन मिळते, असेही त्या यादीत नमूद करण्यात आले आहे. काही माजी आमदारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला पेन्शन दिली जाते, असेही विधान भवनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: ...मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे

जिल्ह्यातील पेन्शनधारक माजी आमदार

विजयसिंह मोहिते-पाटील (1 लाख 2 हजार), दिलीप सोपल (96 हजार), लक्ष्मण ढोबळे (90 हजार), सिद्धाराम म्हेत्रे व उत्तमप्रकाश खंदारे (प्रत्येकी 72 हजार), प्रभावती झाडबुके (72 हजार), राजन पाटील, नरसय्या आडम (प्रत्येकी 70 हजार), निर्मला ठोकळ (64 हजार), धनाजी साठे (62 हजार), प्रकाश यलगुलवार, पांडुरंग पाटील, जयवंतराव जगताप (प्रत्येकी 60 हजार), सिद्रामप्पा पाटील, राजन पाटील, श्‍यामल बागल, दिलीप माने, शिवशरण पाटील, विश्‍वनाथ चाकोते, नरसिंग मेंगजी, डॉ. रामचंद्र साळे, रतिकांत पाटील, इनायतअली पटेल व नारायण पाटील (प्रत्येकी 50 हजार) या माजी आमदारांना राज्य सरकारकडून दरमहा पेन्शन मिळते.

loading image
go to top