स्मार्ट डॉग! अंघोळ टाळण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट डॉग! अंघोळ टाळण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

स्मार्ट डॉग! अंघोळ टाळण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सोशल मीडियावर अनेकदा पाळीव प्राण्यांचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की अगदी अल्पावधीत तुफान चर्चिले जातात. सध्या सोशल मीडियावर अशाच एक श्वानाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. अंघोळ करण्याचा कंटाळा आल्यामुळे या श्वानाने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. पाण्यापासून दूर राहण्यासाठी त्याने जी आयडिया शोधून काढली आहे ती पाहून तुम्हालादेखील नक्कीच हसू अनावर होईल. (dog was afraid of water so did something like this people loves-it-see-funny-video)

सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला व्हिडीओ कबीरा अग्रवाल यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाण्यापासून दूर राहण्यासाठी हा कुत्रा चक्क दोन पायांवर उभा असून त्याने भिंतीला पाठ घट्टपणे टेकवली आहे. तसंच त्याच्या मालकाने त्याच्या अंगावर पाणी टाकलं की तो पाण्याचा फवारा वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: जेवणापूर्वी श्वानांनी केली प्रार्थना;भन्नाट व्हिडीओ व्हायरल

"बाथरुममधील हा एकमेव कोपरा आहे, जेथे पाणी पोहोचू शकत नाही. पण माझा भाऊ जरा जास्तच स्मार्ट आहे त्याने मलाच भिजवून टाकलं", असं कॅप्शन कबीरा अग्रवाल यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओला ७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि १ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील बऱ्याच पाळीव श्वानांचे असे भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अलिकडेच दोन श्वान जेवणापूर्वी प्रार्थना करतांना आढळून आले होते. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर बराच चर्चिला गेला होता.

loading image
go to top