esakal | 'अफवांना बळी पडू नका'; डॉक्टरांचं आवाहन

बोलून बातमी शोधा

doctor
'अफवांना बळी पडू नका'; डॉक्टरांचं आवाहन
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्ये वाढ होत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक हवालदिल झाला असून शक्य होईल त्या पद्धतीने स्वत: ची काळजी घेत आहे. यामध्येच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवरदेखील काही जण विश्वास ठेऊन त्या पद्धतीने उपचार करत आहेत. मात्र, हे अत्यंत चुकीचं असून व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊन कोणताही उपाय करु नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसंच 'अफवांना बळी पडू नका', असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजवर विश्वास ठेऊन काही घरगुती उपाय करत आहेत.मात्र, या अफवांवर विश्वास ठेवू नका. तसंच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पहा असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.