
Health: जेवणानंतर या पाच गोष्टीचे सेवन नका करू, शरीराला पोहचवू शकते हानी.
आपण बऱ्याचदा पाहिले असेल की बरेच लोक जेवण झाल्या झाल्या लगेच झोपी जातात किंवा बर्याच लोकांना जेवणानंतर चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते किंवा बर्याच वेळा आपण नकळत खाल्ल्यावर अशा गोष्टी करायला जातात ते फायद्याऐवजी शरीरावर हानी परिणाम करतात.
आपण नकळत या गोष्टी करुन जातो मात्र त्या केल्यानंतर आपल्या शरीराला बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. म्हणून या गोष्टींची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आणि लक्षात ठेवा की जेवणानंतर या गोष्टी खाण्याची गरज नाही.
1) चुकूनही जेवणानंतर लगेच चहा कॉफी घेऊ नका.
अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे अजिबात योग्य नाही कारण ते पचन प्रक्रियेस अडथळा आणते. डॉक्टरांच्या सल्यानुसार, चहा किंवा कॉफी जेवण करण्यापूर्वी 1 तास आणि जेवणानंतर 1 तासाने सेवन करू करावे.कारण चहा कॉफीमध्ये उपस्थित रासायनिक टॅनिन लोह शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते आणि ते 87 टक्क्यांपर्यंत कमी करते, ज्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.
2) जेवणानंतर कोणतीच फळे खाऊ नका.
रिकाम्या पोटी फळांचे सेवन करणे सर्वोत्तम मानले जाते. लंच,डिनर नंतर किंवा ब्रेकफास्ट सारख्या जड जेवणानंतर फळे अजिबात खाऊ नका. जेव्हा तुमचे पोट आधीच भरलेलं असेल आणि तुम्ही त्या वेळी फळ खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या पोटाला हे फळ पचविण्यात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून मग आपण फळे रिकाम पोटं असतांनाच खावी.
हेही वाचा: Video: खेळण्यातील ट्रेनमधून जेवण वाढणारं सूरतमधील हे हॉटेल
3) जेवणानंतर लगेच गार पाणी पिऊ नका.
अन्न पचनासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, परंतु अन्न खाल्ल्यानंतर लगेच जास्त थंड पाणी पिऊ नये. खाल्ल्यानंतर ताबडतोब थंड पाणी प्यायल्यामुळे गुच्छात अन्न गोठते आणि पचन प्रक्रिया कमी होते आणि अन्नास पचविणे अवघड होते. तज्ज्ञांच्या मते, आपण खाल्ल्यानंतर कोमट पाणी किंवा खोलीच्या तपमानाचे पाणी घेतले पाहिजे आणि ते ही खाल्ल्यानंतर 45 मिनिटांनी प्यावे . जेवणानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये.
4) जेवणानंतर सिगारेट पिणे टाळाच.
आपल्या सर्वांना हे माहित आहे की सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, परंतु जेवल्यानंतर लगेच धूम्रपान करणे अधिक धोकादायक असते.तुम्ही जर का जेवनानंतर सिगारेट ओढली तर तुम्हाला अल्सर होण्याची दाट शक्यता असते. पुढे त्यातून तुम्हाला इरिटेबल बावल सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतो. आतापर्यंत केलेल्या अनेक अभ्यासानुसार आपण खाल्ल्यानंतर ताबडतोब 1 सिगारेट ओढली तर ते 10 सिगारेट पिण्याइतकेच आपल्या शरीराचे नुकसान करते. म्हणून जेवनानंतर सिगारेट पिण्याची सवय बदला.
5) जेवणानंतर मद्यपान करूच नका.
तुम्ही जर का जेवणानंतर अल्कोहोलचे सेवन केले तर त्याचा पचन प्रक्रियेवर देखील परिणाम होतो आणि त्यामुळे शरीरास तसेच आतड्यांनाही बरेच नुकसान होते. म्हणून जर तुम्हाला प्यायचे असेल तर जेवनापूर्वी 20-30 मिनिटांपूर्वी मद्यपान करा.
Web Title: Dont Drink These 5 Things After Lunch
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..