
थोडक्यात:
पावसाळ्यात दूषित अन्न-पाणी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे लहान मुलांमध्ये पोटदुखी, उलट्या-जुलाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
वेळीच उपचार न केल्यास डिहायड्रेशन व थकवा होऊ शकतो; त्यामुळे ओआरएस, अँटिबायोटिक्स व संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
स्वच्छता, घरचे अन्न, आणि ‘व्हिटॅमिन C’युक्त फळांचा आहार मुलांचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे.
How to Protect Kids from Infections in Rainy Season: दूषित पाणी, उघड्यावरील अन्न, हवेतील वाढलेली आर्द्रता, उपनगरांमध्ये सांडपाण्यामुळे दूषित होणारे पाणीस्त्रोत यामुळे लहान मुलांमध्ये पोटाचे तसेच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ६ ते १० वयोगटांतील मुलांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून पोट दुखणे, पोट फुगणे, उलट्या, मळमळ आणि जुलाब यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता उपचार घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पावसाळा आला की रोगराई देखील वाढते. त्यामध्ये लहानमोठ्यांमध्ये संसर्गजन्य आजार, कीटकजन्य आजार यांच्यासह पोटांचेही आजार वाढतात. मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त होतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते, तसेच वाढत्या आर्द्रतेमुळे अन्नपदार्थांमध्ये जीवाणू आणि विषाणूंची वाढ जलदगतीने होते. ज्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांना या समस्या जाणवतात. रस्त्यावरील उघडे अन्न पदार्थ खाल्ल्याने पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, अतिसार, गॅस होणे आणि ताप ही लक्षणे दिसून येतात.
याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ मदभूशी म्हणाले, ‘‘गेल्या तीन-चार आठवड्यांत १० पैकी ७ बालकांना पोटात दुखणे, अतिसार आणि उलट्या अशा समस्या दिसून आल्या आहेत. त्यावर वेळीच उपचार न केल्यास, शरीरातील पाणी कमी होणे म्हणजेच डिहायड्रेशन व थकवा येऊ शकतो. ही लक्षणे दिसल्यास मुलांना ‘ओआरएस’ द्यावे. जर ताप व इतर लक्षणे दिसल्यास बालरोगतज्ज्ञांना दाखवून त्यांना प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) आणि हलका व संतुलित आहार द्यावा. उपचारास विलंब केल्यास लक्षणे आणखी वाढू शकतात.’’
पावसाळ्यात थंडीचे प्रमाण सतत कमी-जास्त होत असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरातील क्रियांवरही होतो. या दिवसांत पचनशक्ती तसेच रोगप्रतिकारशक्ती मंदावते. पालकांनी मुलांची नखे वेळोवेळी कापावी. स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या, कडधान्य, डाळी तसेच खाण्यापूर्वी फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. चिखलात अथवा साठून राहिलेल्या पाण्यात मुलांना अनवाणी पायाने खेळू देऊ नका. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांनी पावसाळ्यात व्हिटॅमिन सी असलेल्या संत्री, आवळा, पेरू, मोसंबी, पपई, किवी, अननस अशा व्हिटॅमिन सी फळांचा आहारात समावेश करावा. त्याने मुलांना आजारांशी लढण्याची क्षमता मिळते, असे आहारतज्ज्ञ अंजली शिंदे यांनी सांगितले.
मुलांना गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्यायला द्या
उघड्यावरील अन्नपदार्थ, कच्चे सॅलड आणि कापून दीर्घकाळ ठेवलेली फळे टाळा
घरी शिजवलेले ताजे व गरम अन्न, दह्यासारख्या प्रोबायोटिक्ससह हलके जेवण द्या
जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवा
जंक फूड खाणे टाळा
आजारांची लक्षणे २४ तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास बालरोगतज्ज्ञांना दाखवा
पावसाळ्यात मुलांना पोटाचे त्रास का होतात? (Why do children suffer from stomach issues during monsoon?)
– वाढलेली आर्द्रता, दूषित अन्न-पाणी आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती यामुळे मुलांना पोटाचे त्रास होतात.
मुलांना अशी लक्षणे दिसल्यास काय करावे? (What should parents do if such symptoms appear in children?)
– ओआरएस द्यावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि संतुलित, हलका आहार द्यावा.
मुलांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? (What precautions should be taken to prevent infections in children?)
– उकळलेले पाणी द्यावे, उघड्यावरचे अन्न टाळावे, स्वच्छता राखावी आणि घरचे ताजे अन्न द्यावे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय द्यावे? (How to boost immunity in children during monsoon?)
– संत्री, आवळा, मोसंबी, पपई, पेरू यांसारखी ‘व्हिटॅमिन C’युक्त फळे आहारात समाविष्ट करावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.