हॅप्पी पेरेंटिग... : बदलतं पालकत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting

काळाबरोबर पालकत्वाच्याही ‘पिढ्या’ कशा बदलत गेल्या हे आपण गेल्या भागात बघितले. जीआय पिढी (ग्रेटेस्ट जनरेशन), मूक पिढी (सायलेंट जनरेशन), बेबी बूमर पिढी यांची आपण माहिती घेतली.

हॅप्पी पेरेंटिग... : बदलतं पालकत्व

काळाबरोबर पालकत्वाच्याही ‘पिढ्या’ कशा बदलत गेल्या हे आपण गेल्या भागात बघितले. जीआय पिढी (ग्रेटेस्ट जनरेशन), मूक पिढी (सायलेंट जनरेशन), बेबी बूमर पिढी यांची आपण माहिती घेतली. आता पुढच्या पिढ्यांची माहिती घेऊ.

जेन-एक्स पिढी (Generation X) : इसवीसन १९६५ ते १९८० मधे जन्मलेल्या या पिढीला जनेरेशन- एक्स हे नाव रॉबर्ट कॅपा या छायाचित्रकाराने दिले. या पिढीतल्या आई-वडिलांनी ‘कुटुंबसंस्था’ या एकसंध संकल्पनोन तडे जाताना अनुभवले. त्याच काळात, एड्सच्या साथीने स्त्री-पुरुष संबंधांवर गंभीर परिणाम घडवले. एम टीव्ही आणि केबलले आक्रमण (?) याच काळातले!... पण यातून या पिढीतले पालक आपल्या मुलांवर जास्तीच लक्ष देऊ लागले. ‘मुले घडविण्याची जबाबदारी आपलीच’ असे मानणारे ‘हेलिकॉप्टर पालक’ याच पिढीतले.

जेन-वाय पिढी (Generation Y) : इसवीसन १९८१ ते १९९६ मध्ये जन्मलेल्या या पिढीला ‘मिलेनिअल पिढी’सुद्धा म्हटले जाते. आधुनिक, गतिमान जीवनशैलीला सामोरे जाणारे या पिढीतले आई-वडील दोघेही नोकरी करायला लागले. या पिढीतल्या पालकांनी ‘मुलांना मुक्तपणे जगू द्या’ अशी भूमिका घेतली. तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर याच काळात सुरू झाला. आधीच्या पिढ्यांना ‘जुनाट’ ठरवून पंगा घेणारी पिढीसुद्धा हीच.

जेन-झेड पिढी (Generation Z) : इसवीसन १९९७ ते २०१० मध्ये जन्मलेल्या या पिढीला त्यांच्या इंटरनेटच्या अतिरिक्त वापरामुळे ‘आय-जनेरेशन’सुद्धा म्हटले जाते. या पिढीतले सध्याचे तरुण आई-वडील हे आता ‘सोशल मीडिया’च्या नव्या जगात वावरायला लागले आहेत. त्यांची मुलेही त्याच जगात एकमेकांशी ‘कनेक्टेड'' राहायचा प्रयत्न करत आहेत. आता मोबाईल आणि संगणक हे जीवनाचे अविभाज्य घटक झालेत.

जेन-अल्फा पिढी (Generation Alpha) : सन २०१० नंतर जन्माला येणारी ही पिढी मोबाईल व इंटरनेटशिवाय जगूच शकणार नाही, असे दिसतेय. या पिढीला ‘सोशल मीडिया’ हेच ‘कुटुंब’ वाटू लागले आहे. या पिढीतल्या पालकांना स्वतःची मुले वाढवण्यातला रस कमी वाटू लागला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्।’ हे वाक्य ही पिढी वेगळ्या अर्थानं जगतेय.

पालकत्वाच्या नव्या व्याख्या बनवणाऱ्या या पिढीला आणि त्यांच्या ‘जेन-झेड’ पालकांना प्रत्येक मुलाला आईनस्टाईन बनविण्याचा ‘फॉर्म्युला’ मिळाला आहे, असं वाटतंय. प्रत्यक्षात किती आईनस्टाईन जन्माला येतील, हे पुढची पिढीच ठरवेल.

टॅग्स :lifestyleparenting