Drinking Hangover :  दारू प्यायल्यावर ‘फिलींग ढगात’ होतं; म्हणजे नेमकं काय?

दारू पिणाऱ्या व्यक्तीला ‘सातवे आसमान पे’ पोहोचल्यासारखे का वाटते
Drinking Hangover
Drinking Hangoveresakal

आज बहुतेक लोक दारूचे सेवन करतात. हे एक नशा आहे. काहींना या नशेत राहणे आवडते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात दारूचे सेवन करतात. काही लोक तर दारूवर असे तुटून पडतात की ती जगातली शेवटची बाटली शिल्लक आहे. काही लोक पैजेखातर तर काही लोक दु:ख विसरण्यासाठी दारू पितात.

अल्कोहोलचे सेवन कमी करावे, असा सल्ला डॉक्टर नेहमीच देत आले आहेत. कारण त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम तर होतोच. पण तुम्ही गंभीर आजारांनाही बळी पडू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का, की दारूमुळे शरीरात काय बदल होतात. आणि नेमके आपण कुठल्या जगात पोहोचतो ज्यामूळे दारू पिणाऱ्या व्यक्तीला ‘सातवे आसमान पे’ पोहोचल्यासारखे वाटते.

Drinking Hangover
New Year 2023 Horoscope: या राशीच्या लोकांची नव्या वर्षात होईल भरभरून प्रगती मात्र...

अल्कोहोल एक द्रव आहे. जी फळे, धान्ये आणि काही भाज्या सडवून तयार केली जाते. या प्रक्रियेदरम्यान एक रसायन जन्माला येते. ज्याला इथेनॉल म्हणतात. मात्र, दारू बनवण्यासाठी इतरही काही गोष्टींचा वापर केला जातो.

जेव्हा तुम्ही अल्कोहोल पितात तेव्हा ते तुमच्या पोटात आणि आतड्यांमधून तुमच्या रक्तात पोहोचते. शरीराच्या सर्व भागातून रक्त वेगाने मेंदूपर्यंत पोहोचते. आणि दारूमुळे तुम्हाला नशा चढल्यासारखे वाटू लागते.

Drinking Hangover
Cheers Meaning : दारु पिताना लोक 'चिअर्स' का म्हणतात?

एथेनॉलपासून  बनलेली दारू जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्या शरीरात असलेले एंजाइम दुसऱ्या केमिकलमध्ये रूपांतरित होतात. यात सर्वात महत्वाचे एसिटेल्डिहाइड आहे. जे एंजाइमचे एका केमिकलमध्ये रूपांतरित करते. ज्याला एसीटेट म्हटले जाते. हे एसीटेट नंतर फॅटी अॅसिड आणि पाण्यात रूपांतरित होते.

आता तर काही वैज्ञानिक असंही म्हणतात की, या एसिटेल्डिहाइडमुळे हॅंगओव्हर होतो. पण, एका रिसर्चनुसार, हॅंगओव्हर आणि एसिटेल्डिहाइड यांच्यात काहीच संबंध नाही. अशात काही तज्ज्ञांचं मत आहे की, हॅंगओव्हरसाठी कॉन्जेनर्स नावाचं केमिकल जबाबदार आहे. जे व्हिस्की तयार करताना यात मिसळले जाते.

Drinking Hangover
कुटुंब डॉट कॉम : ‘कुटुंबा’ला पर्याय नाही!

सोबतच जेवढी जास्त दारू पोटात टाकाल, हॅंगओव्हरही तेवढा जास्त होतो. यात वयाचाही भाग आहे. जर तुम्ही रिकाम्या पोटी दारू प्यायलात तर हॅंगओव्हर जास्त होईल. कारण रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने ती शरीरात जास्त एब्जॉर्ब होते आणि त्यामूळेच दारूड्या व्यक्तीला फिलींग ढगात होतं.

दारूचा हॅंगओव्हर जास्त होऊ नये म्हणून काय करावे

दारूचा हॅंगओव्हर कमी करण्यासाठी काही लोक भरपेट नाश्ता करण्याचा सल्ला देतात. बरेच लोक दारू पिण्याआधी पोट भरून खाण्याचा सल्ला देतात, तर काही लोक अंडी खाण्याचा सल्ला देतात. जेणेकरून हँगओव्हरवर होणार नाही.

Drinking Hangover
Alcohol Odor : दारु पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे?

अंड्यात असलेले अमीनो ऍसिड एसीटाल्डिहाइड तोडण्यास मदत करते. अंडी खाणे थोडेफार उपयुक्त ठरू शकते. परंतु हँगओव्हरपासून पूर्णपणे सुटका होईल की नाही हे सांगणे कठीण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com